पान:अयोध्येचे नबाब.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वा.] wwwwwwwwwwwranaam वाजिदअल्लीशहा. वाजिदअल्लीशहा ह्याचे सर्व प्रकारे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष्य झाल्यामुळे सर्व अयोध्याप्रांतामध्ये अंदाधुंदी माजली. प्रांतोप्रांतीचे अधिकारी स्वेच्छाचारी होऊन प्रजेवर जुलूम करूं लागले. गांवोगांवीं लूटमाऱ्या ह्यांची गर्दी होऊन लोकांच्या जीविताची व वित्ताची शाश्वती राहिली नाही. 'नाझिम' म्हणून प्रत्येक जिल्ह्याचे जे वरिष्ठ अधिकारी होते ते आपापल्या ठिकाणी स्वतंत्र होऊन वाटेल त्या प्रकाराने आपला अंमल चालवू लागले. लखनौ दरबारचा त्यांच्यावर कांहींच धाक न राहिल्यामुळे गरीब रयतेस दाद मागण्यास कोठेच साधन राहिले नाही. त्यामुळे गरीब लोकांच्या व रयतेच्या तक्रारी रेसिडेंटाकडे येऊ लागल्या. तेव्हां रेसिडेंट कर्नल स्लीमन ह्यांनी सर्व अयोध्याप्रांतामध्ये हिंडून वास्तविक स्थिति कोणत्या प्रकारची आहे ती पाहण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी, ता० १ डिसेंबर इ० स० १८४९ पासून ता० २८ फेब्रुवारी इ० स० १८५० पर्यंत सुमारे तीन महिने सर्व अयोध्या प्रांतांत प्रवास केला, व जागोजागची खरी स्थिति निरीक्षण केली. त्यांनी समक्ष पाहिलेल्या सर्व गोष्टींचे वर्णन उत्तम प्रकारे लिहिले असून, तें " अयोध्येतील प्रवास" (Journey through Oude ) ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्यांत अयोध्येच्या बेबंदशाहीचे चित्र अगदी हुबेहूब काढिले असून त्याची योग्यता काही अंशी आर्थर यंगच्या “फ्रान्स देशांतील प्रवास" ( Travels in France ) नामक पुस्तकासारखी आहे. कारण, ते लिहिल्यानंतर ज्याप्रमाणे फ्रान्सदेशामध्ये राज्यक्रांति झाली, त्याप्रमाणे ह्याही प्रवासाने अयोध्येमध्ये राज्यक्रांति झाली. असो. कर्नल स्लीमन ह्यांनी इ० स० १८९० मध्ये अयोध्येच्या राज्य. स्थितीचे आपल्या नेत्रांनी अवलोकन करून गव्हरनर जनरल ह्यांच्याकडे ती सर्व हकीकत लिहून पाठविली. परंतु गव्हरनर जनरल