पान:अयोध्येचे नबाब.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब.. [ भाग wmmmmmm www अनुमताने चालवून दोन वर्षांत अयोध्येच्या राज्याची सुधारणा केली पाहिजे अशी ताकीद केली. त्याप्रमाणे त्याने काही महिने दरबारी लोक जमवून बाह्यात्कारें गव्हरनर जनरकच्या म्हणण्याप्रमाणे आपण राज्यव्यवस्था चालवीत आहोत असा देखावा केला; परंतु त्याचे अंतरंग सर्वस्वी विषयरंगाने रंगून गेल्यामुळे त्यास रंगमहालांतील लीलाचांचून अन्यत्र गोडी वाटेनासी झाली. सुंदर व मनमोहक स्त्रिया, गानवादनपटु व विनोदकुशल गवई, हरहुन्नरी व हजरजबाबी खुषमस्करे इत्यादि लोकांवांचून त्यास दुसरे कांहीं प्रिय वाटेनासे झाले. रेसिडेंट व राज्यांतील भले लोक ह्यांनी त्यास ताळ्यावर आणण्याकरितां पुष्कळ वेळां उपदेश केला व नानात-हेचे प्रयत्न केले; परंतु ते सर्व निष्फळ होऊन तो सर्वस्वी हलकट व पाजी लोकांच्या ताब्यात गेला. लखनौचे रेसिडेंट कर्नल रिचमंड ह्यांची बदली होऊन त्यांच्या जार्गी इ० स० १८४९ साली कर्नल स्लीमन नामक एक चांगले अनुभवी रेसिडेंट तेथे गेले. त्यांनी लखनौच्या शहाण्या व सभ्य लोकांचे एक कौन्सिल नेमून, त्यांच्या मार्फत राज्यसुधारणा करण्याचा पुष्कळ यत्न केला. परंतु खुद नबाब आपल्या हलकट व नीच मित्रमंडळांतून बाहेर निघेना, त्यामुळे त्यांचा निरुपाय होऊन त्यांनाही हात टेंकणे भाग पडले ! नबाबाची इतकी शोचनीय स्थिति झाली की, तो रझीउदौला नामक एका गवयाच्या पूर्णपणे ताब्यांत जाऊन त्याच्या शिवाय कोणासही भेटेनासा झाला !! लखनौचे बडे लोक, सरदारलोक, खुद्द राजघराण्यांतले लोक ह्यांची व त्याची मुळीच भेट होईनाशी झाली !! तात्पर्य, व्यसनार्तता व दुर्जनसंगति ह्यांच्या योगाने मनुष्यावर जितके वाईट परिणाम होणे शक्य आहे तितके वाजिदअल्लीशहावर होऊन, तो नीचतम व निंद्य अशा स्थितीप्रत जाऊन पोहोंचला.