पान:अयोध्येचे नबाब.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ ला.] अयोध्या-देशस्वरूप व प्राचीन माहिती. ३ ३ फैजाबाद-ह्यांत १ फैजाबाद, २ गोंडा आणि ३ बाहरैच असे तीन जिल्हे आहेत. ४ सीतापूर-ह्यांत १ सीतापूर, २ हरदुई आणि ३ खेरी असे तीन जिल्हे आहेत. ह्या चारी विभागांत बरीच इतिहासप्रसिद्ध स्थले आहेत, तथापि त्यांमध्ये लखनौ आणि अयोध्या ही दोन स्थले विशेष अग्रगण्य असून वर्णनीय आहेत. अयोध्याप्रांतांत वसत असलेल्या सृष्टिवैभवास अनुरूप असे त्यांचे राज्यवैभवही अपार असल्यामुळे त्यांचे वर्णन पृथक् सादर करणे भाग आहे. सष्टिवैभव आणि राज्यवैभव ह्यांचा परस्पर संयोग झाल्यामुळे ह्या प्रांताचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास अत्यंत मनोहर असला पाहिजे असे कोणासही वाटेल व ते अगदी साहजिक आहे. परंतु हिंदुस्थानच्या एकंदर इतिहासाच्या स्थितीप्रमाणे अयोध्याप्रांताच्या प्राचीन इतिहासाची स्थिति शोचनीय आहे. महाकवि वाल्मीकि यांनी रामायणासारखें वीरचरितवर्णनपर महाकाव्य लिहिल्यामुळे पौराणिक कालाचा इतिहास त्या रूपाने प्रसिद्ध आहे व त्यामुळे अयोध्येची कीर्ति अजरामर झाली आहे. परंतु त्यापुढील कित्येक शतकांचा इतिहास मुळीच उपलब्ध नाही. दाशरथी रामाच्या चरित्राची थोरवी अगदी अलौकिक आहे. त्यामध्ये मनुष्यस्वभावांतील अत्युच्च व अत्युत्तम गुणांचे चित्र इतके सुंदर काढिले आहे की, त्यापुढे कल्पनेची गति कुंठित झाली आहे असे म्हणणे भाग पडते. रामायणाचा काल सरासरी ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षे मानिला तरी त्यापुढील इतिहास मुळीच उपलब्ध नाही. सूर्यवंशाचा शेवटचा राजा निहत्पाल हा इ० स० पूर्वी इ० स० १४२६ मध्ये एका रणकंदनामध्ये पतन पावला अशी दंतकथा आहे. ती गृहित घेऊन