पान:अयोध्येचे नबाब.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

awranwww २०. भाग ११ वा.] वाजिदअल्लीशहा. अल्प शिक्षण ह्यांमुळे त्यास आपण ऐहिक सुखाच्या शिखरावर जाऊन पोहोंचलों असें वाटू लागावें; आणि राजाची इच्छा हीच सर्वात बलवत्तर असें मानून, त्याने आपल्या मर्जीतल्या लोकांवर, प्रजेच्या नुकसानीकडे दृष्टि न देता, वाटेल ती मेहेरबानी करण्यांत गुंग व्हावे ह्यांत आश्चर्य नाही.” ह्या दोन रेसिडेंटांच्या ह्या अल्पवर्णनावरून वाजिदअल्लीशहा ह्याच्या भावी कारकीर्दीची वाचकांस सहज कल्पना करितां येईल. हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत जे दुर्व्यसनी, दुर्वत्त, विषयासक्त आणि कर्तव्यशून्य असे राजे निर्माण झाले, त्यांतील प्रमुखांमध्ये वाजिदअल्लीची गणना करण्यास हरकत नाही. महाराष्ट्रराज्यसत्तेचा विनाश करण्यास ज्याप्रमाणे दुसरे बाजीराव पेशवे अवतीर्ण झाले, त्याप्रमाणे लखनौच्या राज्यवैभवाची राखरांगोळी करण्यास नबाब वाजिदअल्लीशहा हा अवतीर्ण झाला, असे म्हटले असता त्यांत अतिशयोक्ति होणार नाही. दुसरे बाजीराव पेशवे व नबाब वाजिदअल्लीशहा यांच्या चरित्रांत अतिशय साम्य आहे. त्यांनी ज्याप्रमाणे त्रिंबकजी डेंगळ्यासारख्या नीच व विषयासक्त पुरुषास दिवाणगिरीच्या कामावर नेमिले, त्याप्रमाणे वाजिदअल्लीशहा ह्यानेही अल्लीनकीखान नामक एका नीच मनुष्यास लखनौच्या दिवाणगिरीवर नेमिलें. बाजीराव पेशवे व त्यांचे दिवाण ह्यांनी ज्याप्रमाणे मदनलीला, स्वेच्छाचार आणि चैनबाजी ह्यांकडे लक्ष्य पुरवून राज्यकारभाखची अव्यवस्था केली, त्याप्रमाणे वाजिद अल्लीशहा व त्याचा दिवाण अल्लीनकीखान ह्यांनीही वर्तन करून लखनौच्या राज्याची दुर्दशा केली. वाजिदअल्लीशहा गादीवर बसल्यानंतर इ० स० १८४७ च्या नोवें. बर महिन्यांत हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल लार्ड हार्डिंग ह्यांनी लखनौस जाऊन त्याची भेट घेतली, व त्यास आपला राज्यकारभार रेसिडेंटाचे