पान:अयोध्येचे नबाब.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० वा.] अमजदअल्लीशहा. wwwmmmmmmmmmmmmmmmmmm अस्वस्थता इत्यादि गोष्टी त्या वेळी जास्त महत्त्वाच्या असल्यामुळे अयोध्येचा प्रश्न काही दिवस तसाच तहकूब ठेवणे त्यांस भाग पडले. _ अमजदअल्लीशहाचे कारकीर्दीत अयोध्येचे रेसिडेंट क्याप्टन शेक्सपियर, कर्नल डेविडसन आणि कर्नल रिचमंड हे होते. ह्या तिघांनीही अमजदअल्लीस राज्यसुधारणा करण्याबद्दल पुष्कळ वेळी विनंति केली, परंतु तिचा उपयोग झाला नाही. शेवटी अयोध्येच्या राज्यव्यवस्थेत ब्रिटिश सरकार हात घालणार तोच अमजदअल्ली हा आपल्या दुर्व्यसनास बळी पडून ता० १३ फेब्रुवारी इ० स० १८४७ रोजी इहलोकांतून नष्ट झाला. ह्याची कबर हजरतगंजमधील मकाबऱ्यामध्ये आहे. अमजदअल्ली ह्याच्या कारकीर्दीत सार्वजनिक महत्त्वाच्या गोष्टी म्हटल्या म्हणजे गोमतीनदीवरीक लोखंडी पूल आणि कानपूरलखनौ रस्ता ह्या दोनच होत. ह्याने पंजाबच्या युद्धामध्ये ब्रिटिश सरकारास उत्तम साहाय्य केले. त्याचप्रमाणे त्याने लखनौच्या युरोपियन रहिवाशांच्या विनंतीवरून, त्यांच्या प्रार्थनामंदिराकरितां पुष्कळ जमीन दिली व ते बांधण्यास मदत केली. त्याचप्रमाणे त्यानें ब्रिटिश सरकारच्या परवानगीने 'औध फ्राटियर पोलिस फोर्स' म्हणून एक नवीन सैन्य ठेविलें. परंतु ह्या गोष्टींनी त्याची कारकीर्द महत्त्वाची व चिरस्मरणीय न होतां, तो सदासर्वकाळ आपल्या मनोविकारांच्या स्वाधीन झाल्यामुळे ती दुराचारी व राज्यव्यवहारशून्य अशा राजांच्या मालिकेंत गोवण्यासारखी झाली असे म्हणणे भाग आहे. मात्र ती अवघी पंचवर्षात्मकच झाली हे अयोध्येच्या प्रजेचे भाग्य समजले पाहिजे.