पान:अयोध्येचे नबाब.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ अयोध्येचे नबाब. [ भाग विस्तृत वर्णन केले असून, त्यांनी ब्रिटिश सरकारास इतकी निकृष्ट स्थिति कोणत्या मार्गाने सुधारता येईल व प्रजेस कसे सुख देता येईल ह्यांचेही उत्तम प्रकारे दिग्दर्शन केले होते. त्यांचा लिहिण्याचा भावार्थ इतकाच होता की, "लखनौ दरबाराशी कोणत्याही ठरीव पद्धतीर्ने ब्रिटिश सरकाराचे वर्तन होत नाही. दरबारांतल्या बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचे लक्ष्य जाते आणि महत्त्वाच्या प्रश्नाच्या वेळी ते स्वस्थ बसतात ही चूक आहे. नबाब, प्रधान आणि रेसिडेंट ह्या तिघांच्या हाती सर्व सत्ता असल्यामुळे तिघांचे मतैक्य होऊन राज्यकारभार होत नाही. त्यामुळे एक चांगला असला तरी त्याचा उपयोग नसतो. दुसऱ्यांस त्याच्या विरुद्ध होऊन वाटेल तसा अनर्थ करिता येतो. म्हणजे पर्यायाने, प्रत्येकाच्या हाती पुष्कळ सत्ता आहे व नाही असे म्हणावे लागते. अशी स्थिति राहणे इष्ट नाही......... ही स्थिति सुधारण्यास लॉर्ड बेंटिक ह्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे काही चांगले नियम अमलांत आणून अयोध्येचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला पाहिजे, व होतां होईल तितके करून सर्व व्यवस्था एतद्देशीय लोकांच्या हाती ठेविली पाहिजे. अयोध्येच्या राज्यापैकी कंपनीच्या खजिन्यांत एक रुपयादेखील येतां उपयोगी नाही. अयोध्येचा राज्यकारभार फक्त एकट्या राजाकरिता नसून, राजा व त्याचे प्रजाजन ह्यांच्याकरितां आहे असे मानून तो चालविला पाहिजे.'* सर हेन्री लॉरेन्स ह्यांनी सुचविल्याप्रमाणे अयोध्येच्या राज्याची नीट व्यवस्था करण्याकडे लक्ष्य पुरविण्यास त्या वेळचे गव्हरनर जनरल लॉर्ड हार्डिंग ह्यांस अवकाश सांपडला नाही. कारण, अफगाणिस्थानांतील युद्ध, पंजाबांतील धामधूम व मध्य हिंदुस्थानांतील * Calcutta Review III.,