पान:अयोध्येचे नबाब.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. वाजिदअल्लीशहा. (इ. स. १८४७-इ. स. १८५६). अमजद अल्लीशहा मृत्यु पावल्यानंतर त्याचा मुलगा वाजिदअल्लीशहा हा गादीवर बसला. ह्याचें जन्म ता० २२ जुलई इ० स० १८२२ रोजी झाले असून, ह्याचे वय ह्या वेळी सुमारे २५ वर्षांचें होते. हा लहानपणापासून जनानखान्यांतील ऐषआरामांत वाढल्यामुळे ह्यास सुखोपभोगाच्या संबई लागल्या होत्या. ह्याच्या भावी कारकीर्दीचे स्वप्न अमजदअल्ली जीवंत असतांनाच दिसू लागले होतें. लखनौचे रेसिडेंट क्याप्टन शेकस्पियर ह्यांनी ता० २९ सप्तंबर इ० स० १८४५ रोजी वाजिदअल्लीसंबंधाने असे लिहिले होतें की, “ सद्यःस्थितीवरून लखनौच्या राज्याचा परिणाम चांगला दिसत नाही. त्यांतून अमजदअल्लीस बरेवाईट झाले तर राज्याची स्थिति फारच शोचनीय होईल. कारण, नबाबजादा वाजिदअल्ली ह्याच्या वर्तनावरून फारशी चांगली आशा करण्यास जागा नाही. तो स्वभावतः विषयप्रिय व चंचल वृत्तीचा असून रात्रंदिवस जनानखान्यांत पडलेला असतो. त्यामुळे त्यास नानाप्रकारचे वाईट नाद लागून त्याचे आयुष्य व द्रव्य विषयोपभोगास अर्पण केले आहे असे दिसते." ह्या क्याप्टन शेस्पियर ह्यांच्या लेखास त्यांच्यामागून आलेले लखनौचे दुसरे रेसिडेंट कर्नल रिचमंड ह्यांचीही साक्ष पटते. त्यांनीही आपल्या वर्ष दोन वर्षांच्या अनुभवावरून वाजिद अल्लीशहा ह्याजबद्दल असे लिहिले होते की, "क्याप्टन शेकस्पियर ह्यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्याची स्थिति असून, दुर्व्यसनें। हलकट लोकांची संगति, अनपेक्षित अधिकारप्राप्ति आणि