पान:अयोध्येचे नबाब.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १० वा.] अमजदअल्लीशहा. १०५ wwwar RANA wwwwwwwwwww तोही त्या जागेवर फारसा टिकला नाही. शेवटी हलकट व पाजी माणसांच्या हाती राज्यकारभार जाऊन राज्यांमध्ये अस्वस्थता उत्पन्न झाली. अर्थात् क्षणोक्षणी जेथें दिवाणांची अदलाबदल हाऊं लागली व प्याद्याचे फर्जी व फर्जीचे प्यादे होऊ लागले, तेथे सुरळीत राज्यकारभार चालण्याची आशा करणे व्यर्थ आहे! नबाब अमजदअल्ली ह्याच्या दुर्वर्तनामुळे व विषयार्ततेमुळे अयोध्येची स्थिति अतिशय बिघडली. ती तीन चार वर्षांच्या अवधीत इतक्या थरास जाऊन पोहोंचली की, ब्रिटिश सरकारास तीत हात घालणे जरूर वाटू लागले. सर हेन्री लॉरेन्स ह्यांनी इ० स० १८४५ मध्ये अयोध्येच्या स्थितीचे पुढे लिहिल्याप्रमाणे वर्णन केले आहे : "प्रतिवर्षों अयोध्येची स्थिति अधिक अधिक निकृष्ट होत चालली आहे. राज्याचा वसूल कमी कमी होत चालला आहे. जप्तीनदार लोकांच्या पदरी एका लक्षापेक्षा अधिक सैन्य आहे; व वसल जमा करण्यास संस्थानचे सैन्य त्यांच्या निम्में आहे! अयोध्येच्या अर्ध्या अधिक भागामध्ये सभोवती दाट झाडीने वेष्टिलेले असे बळकट किल्ले आहेत. हे पूर्वी राज्यसंरक्षणास उपयोगी पडत असत; परंतु सांप्रत ते प्रमत्त लोकांस स्वसंरक्षण करण्यास साधनीभूत झाले आहेत. आमील व संस्थानचे इतर नौकर हे दरबारास लांच देऊन अधिकारसंपन्न झाल्यामुळे, त्यांच्या अंगी कसली ती योग्यता नाही. गरीब लोक त्यांना राज्याचा वसूल देतात, बाकीचे त्यांस मुळीच जुमानीत नाहीत. सर्व राज्यामध्ये दिवाणी किंवा न्यायखातें अशा नांवास शोभण्यासारखें एकही कोर्ट नाही......... तात्पर्य, राज्यपद्धतीचा सर्वस्वी नाश होऊन राज्याची अगदी दुर्दशा झाली आहे व ती सुधारण्याची आशा राहिली नाही." वरील आशयाचे सर हेन्री लॉरेन्स ह्यांनी अयोध्येच्या स्थितीचे