पान:अयोध्येचे नबाब.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वा.] महमदअल्लीशहा. कारकीर्दीत हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल लॉर्ड ऑक्लंड हे होते. ह्यांनी, ता० ८ जुलई इ० स० १८३९ रोजी, अयोध्येच्या राज्यपद्धतीत चांगली सुधारणा केल्यामुळे महमदअल्लीशहाचे अभिनंदन करून त्याजवर नवीन तहाप्रमाणे बसविलेला जादा लष्करी खर्च कमी करण्याचे आभिवचन दिले होते. महमदअल्लीशहा हा ता० १६ मे इ० स० १८४२ ह्या वर्षी मृत्यु पावला. ह्याचे शव ह्याच्या इच्छेप्रमाणे हुसेनाबाद इमामवाड्यामध्ये पुरण्यांत आले. ह्याने आपल्या मृत्युसमयी ३५ लक्ष रोख रुपये व १,२४,००० सोन्याच्या मोहरा आपल्या खजिन्यांत शिल्लक ठेविल्या होत्या. शिवाय ह्याची कंपनीच्या खजिन्यांत शिल्लक होती ती वेगळीच. ह्याच्या मागून ह्याचा मुलगा अमजदअल्लीशहा हा गादीवर बसला.