पान:अयोध्येचे नबाब.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १० वा. अमजदअल्लीशहा. (इ० स० १८४२-इ० स० १८४७). महमदअल्लीशहा मृत्यु पावल्यानंतर त्याचा दुसरा मुलगा अमजदअल्ली हा लखनौच्या गादीवर बसला. ह्यास अशगरअल्ली म्हणून एक वडील बंधु होता, परंतु तो महमदअल्लीशहा हयात असतांनाच मृत्यु पावल्यामुळे मुसलमानी धर्माप्रमाणे त्याच्या मुलाचा लखनौच्या गादीवरील हक्क नाहीसा झाला होता. अमजदअल्ली गादीवर येतांच राज्यांत पूर्ववत् अव्यवस्था सुरू झाली. अमजदअल्ली हा स्वभावाने दुष्ट किंवा दुर्बुद्धि असा नव्हता; परंतु लहानपणापासून त्यास दुस्संगति प्राप्त झाल्यामुळे त्यास शृंगारविषयाची गोडी लागली होती. त्यामुळे त्यास राज्यपद प्राप्त होतांच तो कामदेवाचा पूर्ण भक्त बनला. त्याने राज्यसूत्रे हाती येतांच पूर्वीचे प्रधानमंडळ बदलून त्या ठिकाणी आपले कुटिलमित्रमंडळ आणण्याचा प्रयत्न केला. महमदअल्लीच्या वेळचा प्रधान शरफउद्दौला नामक एक भला माणूस लखनौचा राज्यकारभार पहात होता. त्याने नवीन यजमानाचे दुर्वृत्त पाहतांच आपल्या जागेचा राजीनामा दिला. अमजदअल्लीस ती गोष्ट पूर्ण पसंत वाटून त्याने त्या जागेवर आपल्या मर्जीतला इमाद हुसेन नामक एक निर्बल माणूस नेमिला व त्यास अमीनउद्दौला ही पदवी दिली. परंतु चार पांच महिन्यांच्या अवधीतच त्यावर त्याची अवकृपा होऊन त्यास प्रधानगिरी सोडावी लागली. त्याच्या मागून, महमदअ-. ल्लीच्या वेळेस मक्केस गेलेला जुना प्रधान मनोवरउद्दौला हा पुनः लखनौस परत आला होता, त्यास पुनः दिवाणगिरीची वस्त्रे दिली. पण लखनौ येथील राजकीय कट व नबाबाची चंचलवृत्ति ह्यांमुळे