पान:अयोध्येचे नबाब.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ अयोध्येचे नबाब. [भाग तो मेल्यानंतर महमदशहाने हकीम मेहेंदी ह्याचा पुतण्या मनोवरउदौला ह्यास आपला दिवाण केले. हा इसम मोठा प्रामाणिक क भला गृहस्थ होता; परंतु त्याचे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष्य असे. त्याने दोन वर्षांनंतर दिवाणगिरीचा राजीनामा देऊन मकेस गमन केले. ह्याने लखनौ येथे हकीम मेहेंदीची मोठी कबर बांधली आहे. ह्याच्या मागून शर्फउद्दौला हा प्रधान झाला. तो महमदअल्लीशहाच्या मृत्यूपर्यंत आपल्या अधिकारावर कायम होता. महमदअल्ली हा ऐषआरामी व विषयप्रिय असा नबाब नसल्यामुळे त्याने आपल्या कारकीर्दीत थोडीबहुत सुधारणा केली. त्याने सादतअल्लीच्या वेळची 'अमानी' वसुलाची पद्धति पुनः चालू केली व सं. स्थानच्या खजिन्याची चांगली सुधारणा केली. तो गादीवर बसला त्या वेळी सादतअल्लीच्या १० कोट द्रव्यांपैकी फक्त ७० लक्ष रुपये शिल्लक राहिले होते. त्यांत ह्यानें भर घालून लखनौ येथे काही चांगल्या इमारती बांधल्या. त्याने हुसेनाबाद इमामवाडा म्हणून एक सुंदर इमारत आपले स्वतःचे कबरस्थान करण्यासाठी बांधली, व तिच्या खर्चाकरितां कंपनीस दिलेल्या कर्जाचे व्याज लावून दिले. त्याने ह्याच इमामवाड्याशेजारी एक भव्य तलाव बांधला, व दिल्लीच्या जुम्मामशिदीची बरोबरी करणारी एक नवीन जुम्मामशीद लखनौ येथे तयार करण्याचे काम चालविले. परंतु ते संपूर्ण होण्यापूर्वीच तो मृत्यु पावला. ह्याशिवाय त्याने सातखंडा म्हणून एक सातमजली इमारत बांधण्यास प्रारंभ करून तिचे चार मजले तयार केले होते. तात्पर्य, ह्याने आपले द्रव्य वाईट रीतीनें न उधळतां त्याचा चांगला विनियोग केला. ह्याने ८० लक्ष रुपये कंपनीस व्याजी दिले होते. ह्यास ब्रिटिश सरकाराच्या कृपेमुळे गादी प्राप्त झाली होती म्हणून त्याने त्यांचे उपकार स्मरून त्यांस वेळोवेळी चांगली मदत केली होती. ह्याच्या