पान:अयोध्येचे नबाब.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग nrARMA निसर्गदेवता ह्या प्रांतामध्ये मूर्तिमंत वसत असल्यामुळे ते अगदी अपूर्व आहे. सृष्टिसौंदर्याचे वर्णन करितांना एका संस्कृत कवीनें श्लोक. हरिणचरणक्षुण्णोपान्ताः सशाद्वलनिर्झराः । कुसुमललितैर्विष्वग्वातैस्तरंगितपादपाः ॥ विविधविहगश्रेणीचित्रस्वनप्रतिनादिता । मनसि न मुदं दध्युः केषां शिवा वनभमय:* ॥१॥ म्हणून जें वर्णन केले आहे, त्याचा अनुभव अयोध्याप्रांतांत अनेक स्थली पूर्णपणे येऊन सृष्टिसौंदर्यविलासी जनांस परमानंद वाटतो. तात्पर्य, धनधान्यसमृद्धता आणि सृष्टिवैभवप्रचुरता इत्यादि गुणांनी हा प्रदेश संपन्न असल्यामुळे ह्यास "हिंदुस्थानची उद्यानभूमि" (Garden of India ) असें पाश्चात्य जनांनी अभिधान दिले आहे, तें अगदी यथार्थ आहे. अयोध्याप्रांताचे राज्यव्यवस्थेसंबंधाने मुख्य चार विभाग केलेले असून त्या प्रत्येकामध्ये तीन तीन जिल्हे समाविष्ट केले आहेत. ते येणेप्रमाणे: १ लखनौ-ह्यांत १ लखनौ, २ बाराबंकी, ३ उनाव म असे तीन जिल्हे आहेत. २ रायबरेली-ह्यांत १ रायबरेली, २ सुलतानपूर आणि ३ र प्रतापगड असे तीन जिल्हे आहेत. ___ *भावार्थ:-ज्या ठिकाणी हिरवेंचार गवत उगवले आहे ; आजूबाजूस सुंदर झरे वाहत आहेत ; जवळ हरिण चस्त आहेत ; पुष्पांच्या संसर्गाने सुगंधी झालेले वायु पाहत असून त्यांच्या वेगाने वृक्ष डोलत आहेत ; व अनेक पक्षी मंजुळ शब्द करीत असल्यामुळे तो सर्वभाग नादमय होउन गेला आहे : अशा प्रकारचे रमणीय वनप्रदेश कोणाच्या वरें मनास आनंद देणार नाहीत ?