पान:अयोध्येचे नबाब.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० अयोध्येचे नबाब. [भाग असल्यामुळे तिने रेसिडेंटास न जुमानून त्यांच्या सैन्याबरोबर युद्ध केले. परंतु तिचे सैन्य अगदी थोडे असून अव्यवस्थित असल्यामुळे इंग्रज सैन्याचे अधिपति कर्नल मांटीथ ह्यांनी तिचा पराभव केला व शेवटी तिला व तिचा नातू मुन्नाजान ह्यांस कैद करून रेसिडेन्सीमध्ये आणिले. पुढे त्यांनी त्या उभयतांस चुनार येथे पाठविले. तेथे त्यांस मरेपर्यंत २४०० रुपये दरमहा पेनशन मिळत असे. तेथेच ती उभयतां मृत्यु पावली. नंतर रेसिडेंट कर्नल लो ह्यांनी, नासिरउद्दीनाचा चुलता नासिरउद्दौला ह्यास मादीवर बसविण्याचा निश्चय केला, व आपण सांगाल त्याप्रमाणे तह करण्यास मी तयार आहे असे त्याजकडून लेखी लिहून घेऊन, त्यास 'महमदअल्लीशहा' हे नांव देऊन गादीवर बसविले. नंतर त्याजकडून ता० १८ सप्तंबर इ० स० १८३७ रोजी नवीन तह करून घेतला. ह्यामध्ये "इ० स० १८०१ च्या तहाप्रमाणे ब्रिटिश सरकाराने अयोध्येचे संरक्षण करणे त्यांचे कर्तव्य होते, त्याप्रमाणे त्यांनी केले; परंतु इ० स० १८०१ चा तह शांतपणाने झाला नसल्यामुळे त्यांत सुधारणा होणे अवश्य आहे. ह्याकरितां, पूर्वीच्या तहामध्ये अयोध्येच्या सैन्याची संख्या मर्यादित केली आहे ती मर्यादा आतां दूर करून, राज्याच्या संरक्षणाकरितां नबाबानें रेसिडेंटाच्या सल्याने आपले सैन्य मर्जीप्रमाणे वाढवावें, व त्याच्या रिसाल्याच्या दोन पलटणी, पायदळाच्या पांच पलटणी, आणि गोलंदाजाच्या दोन पलटणी नवीन ठेवून त्यांची व्यवस्था ब्रिटिश अधिकाऱ्यांनी करावी व त्यांच्या खर्चाकरितां १६ लक्ष रुपये नबाबाने द्यावेत !” अशा तन्हेचे फेरफार केले. ह्याच तहामध्ये आणखी असें एक कलम घातले की, "नबाबाने रेसिडेंटाच्या अनुमताने राज्यकारभार चालवावा व राज्यांतील पोलीस, मुलकी व न्याय इत्यादि खात्यांची सुधारणा