पान:अयोध्येचे नबाब.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ वा. महमदअल्लीशहा. (इ. स. १८३७-इ० स० १८४२). नासिरउद्दीन हैदर मृत्यु पावल्यानंतर लखनौ येथे मोठा राज्यक्रांतीचा प्रसंग प्राप्त झाला. नासिरउद्दीन ह्याची आई पादशहा बेगम हिला त्याचे मृत्युवृत्त समजतांच, ती नासिरउद्दीनाचा अप्रिय पत्र मुन्नाजान ह्यास बरोबर घेऊन फरहतबक्ष राजवाड्यामध्ये आली व तिने आपल्या तैनातीतले लोक व इतर शिपाईप्यादे ह्यांच्या साहाय्याने त्यास सिंहासनावर बसविले. मुन्नाजान हा नासिरउद्दीनाचा औरस पुत्र होता, परंतु नासिरउद्दीन हा विषयासक्त व मूर्ख असल्यामळे त्याने आपल्या दोलारी नामक वारांगनेवर मोहित होऊन तिचा मुलगा खानजहा ह्यास आपल्या पश्चात् गादी देण्याविषयों रेसिडेंटास कळविले होते; व मुन्नाजान हा आपला औरस पुत्र नाही व त्यास गादी देऊं नये असे सांगून, त्याचा लखनौच्या गादीवरील हक्क नाहीसा केला होता. तेव्हां अर्थात्च नासिरउद्दीनाच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्नसंशयग्रस्त होऊन रेसिडेंटावर त्याचा निकाल करण्याची जबाबदारी येऊन पडावी हे साहजिक आहे. रेसिडेंट मुन्नाजान ह्याचा हक्क मंजर करील ही खात्री नसल्यामुळे, व काही अंशी अविचारबुद्धीने, नासिरउद्दीनाची आई पादशहा बेगम हिने त्यास एकदम गादीवर बसविण्याची घाई केली. त्यामुळे लखनौचे रेसिडेंट कर्नल लो ह्यांस तिच्या कृतीचा प्रतिकार करणे भाग पडून त्यांनी राजवाड्यावर सैन्य पाठविले. बादशहा बेगम ही शूर व हिय्येबाज स्त्री