पान:अयोध्येचे नबाब.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ वा.] नासिरउद्दीन हैदर. ९७ जनांस देखील तो अप्रिय होऊन, त्यांचे व त्याचे वैमनस्य पडले. त्याने प्रत्यक्ष आपला पुत्र मुन्नाजान ह्याचा गादीवरील हक्क नाहीसा करण्याचा यत्न करून त्यास राजवाड्यांतून काढवून दिले. परंतु त्याची आजी-गाजीउद्दीन हैदर ह्याची बायको-पादशहा बेगम हिने त्यास आपल्या ताब्यात घेऊन त्याचे संरक्षण केले. खुद्द राजवाड्यांत प्रत्यक्ष राजपुत्रास जेथें थारा मिळेनासा झाला, तेथें गरीब रयतेची दाद कशी लागणार, ह्याचा विचार निराळा करावयास नकोच! नासिरउद्दीन ह्याच्या कारकीर्दीत अखेर अखेर इतकी वाईट स्थिति झाली की, ब्रिटिश रेसिडेंट कर्नल लो ह्यांनी त्याची भेट घेण्याचेही अमान्य केले. आणि त्यांनी गव्हरनर जनरल लॉर्ड बेंटिक ह्यांस असे लिहून कळविले की, "अयोध्येच्या राज्याची इतकी निकृष्ट अवस्था झाली आहे की, जर राज्यकारभार आपल्या हाती घेतला नाही तर त्याचा सर्वस्वी नाश होईल." लॉर्ड बेंटिक हे शहाणे मुत्सद्दी असल्यामुळे त्यांनी एकदम तशी गोष्ट अमलांत न आणितां, नासिरउद्दीन ह्याची समक्ष भेट घेऊन राज्यकारभार सुधारण्याबद्दल त्याची कानउघाडणी केली; व तशी सुधारणा दृष्टोत्पत्तीस आली नाही तर राज्यव्यवस्था ब्रिटिश सरकार आपल्या ताब्यात घेईल असें त्यास कळविलें, परंतु त्याचा तादृश परिणाम कांहींच झाला नाही. शेवटी त्यांनी इ० स० १८३१ च्या जुलई महिन्यांत कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ह्यांस लखनौची राज्यव्यवस्था आपल्या हाती घेण्याबद्दल परवानगी मागितली. ह्या संबंधांत बराच पत्रव्यवहार होऊन, ता० १६ जुलई इ० स० १८३४ रोजी, त्यांचे शेवटचे उत्तर आले. त्याप्रमाणे अयोध्येची राज्यव्यवस्था ब्रिटिश सरकारच्या हाती जाण्याचा योग आला; परंतु सुदैवाने