पान:अयोध्येचे नबाब.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ अयोध्येचे नबाब. [भाग ८ वा. ] AM त्या वेळी अयोध्येच्या प्रधानपदावर हकीम मेहेंदी हा शहाणा माणूस असल्यामुळे त्यानें लॉर्ड बेंटिक साहेबांचे मन वळवून व राज्यांत पुष्कळ सुधारणा करून दाखवून आलेला प्रसंग टाळला. परंतु चांगल्या माणसाचें व मूर्खाचे फार दिवस सख्य राहणे शक्य नसत्यामुळे, नासिरउद्दीन ह्याने हकीम मेहेंदी ह्यास प्रधानपदावरून दूर केलें, व आपल्या मर्जीतल्या मंडळीपैकी रोषनउद्दौला नामक एका इसमास प्रधानगिरीची वस्त्रे दिली. त्यामुळे पुनः राज्यव्यवस्थेत घोटाळा झाला. हकीम महेंदी प्रधानपदावरून दूर झाल्यानंतर राज्याची पूर्ववत् अव्यवस्था होऊन ब्रिटिश सरकाराला तीत हात घालण्याचा प्रसंग येऊन ठेपला. डा० बटर ह्यांनी इ. स. १८३७ मध्ये अयोध्येचे जें वर्णन लिहिले आहे ते वाचलें म्हणजे झोटिंगपादशाहीची पूर्ण कल्पना करितां येते. अयोध्येचे रेसिडेंट कर्नल लो ह्यांनी नासिरउद्दीन हैदर ह्यास पदच्युत करून दुसऱ्या योग्य माणसास गादीवर बसवावें व सर्व राज्यव्यवस्था आपल्या ताब्यांत घ्यावी असा विचार चालविला, व अयोध्येच्या प्रजेमध्येही कंपनी सरकार राज्यव्यवस्था आपल्या हाती घेणार, अशी दाट बातमी पसरली. परंतु तितकी स्थिति येण्यापूर्वीच ता० ७ जुलई इ० स० १८३७ रोजी नासिरउद्दीन हैदर हा विषप्रयोग होऊन एकाएकी मृत्यु पावला. त्यामुळे त्याच्या पदच्युतीचा प्रसंग आपोआप टळला.. नासिरउद्दीन हैदर मृत्यु पावल्यानंतर त्याच्या गादीच्या वारसाविषयी बराच तंटा उपस्थित होऊन रक्तपातापर्यंत मजल येऊन पोहोचली. त्याचा वृत्तांत पुढील भागीं सांगण्यात येईल. नासिरउद्दीन ह्याचे प्रेत गोमती नदीच्या उत्तरेकडील भागामध्ये करबालानामक ठिकाणी पुरण्यांत आले.