पान:अयोध्येचे नबाब.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग mmmmmmmmm नासिरउद्दीन हैदर ह्याची दिनचर्या मोठी मौजेची लिहिली आहे. हे पुस्तक कांहींसें ऐतिहासिक कादंबरीच्या धर्तीवर लिहिले असून त्यामध्ये ह्या लखनौच्या राजविलासी व चैनी नबाबाच्या अनेक विलक्षण व गमतीच्या गोष्टी दिल्या आहेत. त्यांत त्याच्या एका युरोपियन न्हाव्याची एक गोष्ट दिली आहे, ती वाचून क्षणभर मौज वाटल्यावांचून राहत नाही. नासिरउद्दीन हैदर ह्यास युरोपियन त-हेनें राहण्याचा फार शोक असे. तेव्हां त्याने आपले केस विंचरण्याकरिता व ते साफसूफ करण्याकरितां रेसिडेन्सीमध्ये नाणावलेला एक युरोपियन न्हावी* आणला. त्याने त्यास आपल्या चातुर्याने संतुष्ट केले. त्यामुळे सरकारस्वारी त्यावर इतकी खुष झाली की, तिने त्यास एकदम 'सर्फराजखान' ही पदवी देऊन त्यास लखनौच्या दरबारांत अग्रस्थानी विरानित केले. ह्या नापिकानें नासिरउद्दीन हैदर ह्यावर इतका पगडा बसविला की, त्याच्याशिवाय त्यास क्षणभर देखील करमेनासे झाले. ह्या न्हाव्यासंबंधानें कांही विरुद्ध टीकापर लेख "आग्रा आखबार" वगैरे वर्तमानपत्रांतून येत असत, म्हणून त्याने त्यांची उत्तरे लिहिण्याकरितां एक शंभर रुपये पगाराचा इसम ठेविला होता. त्याने नासिरउद्दीन ह्यास मोहून सोडून त्याजवळून २४ लक्ष रुपयांची संपत्ति मिळविली! अर्थात् अशा नीच व हलकट लोकांच्या संगतीमुळे त्याची सर्व योग्यता नाहीशी झाली व त्याच्या कुटुंबीय

  • ह्या न्हाव्याचे नांव De Russett असे होते. ह्याशिवाय आणखी चार युरोपियन लोक नबाव नासिरउद्दीन ह्याचे फार दोस्त असत. त्यांची नांवें व दुद्दे येणेप्रमाणे :-१ Mauntz, हा चित्रकार व गायक होता. २ Croupley, हा ग्रंथशालाध्यक्ष होता. ३ wright हा राजगुरु होता. Captain Mag. nees ह्याचा हुद्दा समजत नाही. ह्या आंग्लपंचायतनाच्या नादाने नासिरउद्दीन वागत असे.