पान:अयोध्येचे नबाब.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग wwaman तिला मुकंदरा औलिया असें नांव दिले होते. ह्याने आपल्या पूर्वजांचे रत्नखचित एतद्देशीय चालीचे सिंहासन बदलून, त्याच्या ऐवजी एक हस्तिदंती खुर्ची तयार करून पाश्चात् तन्हेचा दरबार बनविला होता. तो युरोपियन लोकांचा सत्कार करण्याविषयी तत्पर असे. इ० स० १८२७ साली लॉर्ड काँबरमियर हे लखनौस गेले होते. त्यांनी त्याच्या आदरातिथ्याची तारीफ करून त्याच्या वैभवाचे फार वर्णन केले आहे. त्या वेळी त्याने त्यांस आपली एक बहुमूल्य रत्नांनी जडलेली व मोत्यांच्या व पाचेच्या सरांनी सुशोभित केलेली तसबीर नजर केली होती. ह्याने दिल्लीच्या बादशाहाजादीशी लग्न लाविले असून तिचे नांव 'ताजमहाल' असें ठेविले होते. ही सौंदर्यलतिका 'ताजमहाल' ह्या नांवास शोभणारी असून तिचे यश आग्र्याच्या सुप्रसिद्ध ताजमहालच्या शुभ्र वर्णाप्रमाणे अकलंक होतें, तिचा पोषाख व रत्नालंकार इतके मूल्यवान व प्रेक्षणीय असत की, ते पाहून कोणाचेही नेत्र दिपून जात.* ह्याशिवाय अफझलमहाल, मलिकाझमानी, वगरे स्वरूपसुंदर व यौवनसंपन्न स्त्रिया त्याच्या रंगमहालांत अग्रगण्य होत्या. ह्या

  • हिच्या पोषाखाचे वर्णन मिस फ्यानी पास नामक एका आंग्लयुवतीने केले आहे. ते वाचलें म्हणजे नासिरउद्दीन हैदरच्या वैभवाची कल्पना वाचकांस करितां येईल.

“Her dress was of gold and scarlet brocade, and her hair was literally strewed with pearls, which hung down upon her neck in long single strings, terminating in large pearls, which mixed with and hung as low as her hair, which was curled on each side of head in long ringlets, like the Charles the Second's beauties. On her forehead she wore a small gold circlet, from which dem pended large pearls interspersed with emeralds. Above this was