पान:अयोध्येचे नबाब.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ वा.] नासिरउद्दीन हैदर. wwwwwwwwwwwwwww मुत्सद्दी आगा मीर हाही नासिरउद्दीनाची प्रधानगिरी करण्यास तयार झाला. हा पुरुष काही अंशी महाराष्ट्राच्या इतिहासांत प्रसिद्ध असलेल्या छत्रपति संभाजी महाराजांच्या कलुषा प्रधानासारखा होता. कलुषाने एकाच नृपतीचा नाश केला, पण ह्याने दोघां नृपतींना व्यसनात करून राज्याचा विध्वंस केला. शेवटी ह्याचा व नासिरउद्दीनाचा बेबनाव होऊन तो अयोध्येच्या राज्यांतून निघून गेला. त्या वेळी त्याने २५ कोटींची संपत्ति नेली असें म्हणतात. त्याच्यानंतर प्रधानपद फाझलअल्ली ह्यास मिळाले. परंतु त्यावर लवकरच हुजूरची इतराजी होऊन, शेवटी दिवाणगिरीचा अधिकार मेहेंदीअल्लीखान ऊर्फ हकीम मेहेंदी ह्यास प्राप्त झाला. दिवाण हकीम मेहेंदी हा स्वतंत्र व बाणेदार गृहस्थ असून त्याने आपल्या कारकीर्दीत लखनौचा राज्यकारभार चांगल्या त-हेनें चालविण्याचा यत्न केला. परंतु यजमान मूर्ख भेटल्यामुळे त्याचा काही उपयोग न होऊन, त्यास त्यांच्या पुढे हात टेंकावे लागले. तथापि, त्यांतल्या त्यांत, काही वर्षे हकीम मेहेंदी प्रधानपदावर आरूढ होता म्हणून अयोध्येच्या प्रजेचा निर्वाह लागला. FATEHTS नासिरउद्दीन हैदर ह्याच्या चरित्राचे बरोबर वर्णन करणे कठीण आहे. ह्याच्या संबंधानें कांहीं ग्रंथकारांनी फार प्रतिकूल व निंदाप्रचुर लेख लिहिले आहेत व कांही लेखकांनी त्याचे गुणानुवादही वर्णन केले आहेत. ह्या दोन्ही प्रकारच्या लेखांचे समदृष्टीने निरीक्षण केले तरी शेवटी नासिरउद्दीन ह्याच्या विषयी फारसें अनुकूल मत बनत नाही. हा स्वभावतः निरुपद्रवी व उदारवृत्ति होता. ह्याचे इंग्रज लोकांविषयी व त्यांच्या चालीरीतींविषयी फार चांगले मत असून त्यांचे अनुकरण करण्याकडे त्याचा फार कल असे. एवढेच नव्हे, तर त्याने स्वतः मिस् वाल्टर्स नामक एका युरोपियन स्त्रीचा अंगिकार करून