पान:अयोध्येचे नबाब.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

PATRJu wwwm marawwwwww ७ वा.] गाझीउद्दीन हैदर. कधीही दुर्लक्ष्य करणार नाही." ह्यावरून तो अरसिक किंवा मूर्ख राज्यकर्ता होता असे म्हणणे कठीण आहे. मात्र त्याने आपला सर्व राज्यकारभार आपला कारभारी आगा मीर ह्याच्या हातांत दिल्यामुळे त्याची विशेष अपकीर्ति झाली, व अयोध्येच्या राज्याचे नुकसान झाले, हे प्रांजलपणे कबूल करणे भाग आहे. गाझीउद्दीन हैदर हा ता० २० आक्टोबर इ० स० १८२७ रोजी मृत्यु पावला. त्याने ईस्ट इंडिया कंपनीस एकंदर ३॥ कोट रुपये कर्जाऊ दिले होते. त्याच्या कारकीर्दीत त्यास राज्यसुधारणा करण्यास आवश्यक अशी सर्व साधनें अनुकूल होती. त्याजवळ त्याच्या बापाने ठेविलेला विपुल पैसा होता, आणि त्यास कोणी प्रतिस्पर्धी नसल्यामुळे व इंग्रज सैन्य त्याच्या साहाय्यार्थ तत्पर असल्यामुळे त्यास गादी जाण्याचीही भीति नव्हती. तेव्हां अशा स्थितीत त्यास आपली कर्तृत्वशक्ति चांगली प्रगट करून प्रजेस संतुष्ट करितां आले असते ! परंतु नुसत्या साधनांनी कार्य होत नाही; त्यांची योजना करणारा योजकही चतुर असला पाहिजे.