पान:अयोध्येचे नबाब.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ वा. nesen नासिरउद्दीन हैदर. (इ० स० १८२७-इ० स० १८३७). गाझीउद्दीन हैदर मृत्यु पावल्यानंतर त्याचा मुलगा मुलेमानजहा हा नासिरउद्दीन हैदर हे नांव धारण करून लखनौच्या गादीचा अधिपति झाला. ह्याच्या कारकीर्दीपासून लखनौच्या वैभवास उतरती कळा लागली असे म्हणण्यास हरकत नाही. राजाचे मुख्य कर्तव्य में प्रजापालन तें एकीकडे राहून ज्या ठिकाणी विलासरंग सुरू होतात, तेथें अवनतीस प्रारंभ होतो, असेंच मानिले पाहिजे. नासिरउद्दीन हैदर ह्याच्या कारकीर्दीपासून लखनौच्या गादीवर राजकार्यप्रवीण व प्रजानुरंजनदक्ष असा महमद अल्लीशिवाय एकही पुरुष आला नाही. उलट, विषयलंपट, दुराचारी, अरसिक आणि मूढमति असेच नबाब एकापेक्षा एक वरचढ निर्माण झाले. त्यामुळे लखनौच्या राज्यलक्ष्मीस त्यांचा तिरस्कार वाटून तिने त्यांचा त्याग करण्यास सुरुवात केली, असे म्हटले तरी चालेल. नासिरउद्दीन ह्याची कारकीर्द म्हणजे अनाचार व दुष्कृति ह्यांचे साम्राज्य असून तीत इतिहासांत लिहिण्यासारख्या गोष्टी फारच थोड्या आहेत-किंबहुना नाहीत म्हटले तरी चालेल. परंतु केव्हां केव्हां असच्चरित्रापासूनही बोध घेण्यासारखा असतो, असे समजून त्याच्या कारकीर्दीचा अल्पसा वृत्तांत येथे दिला आहे. गाझीउद्दीन हैदर मत्यु पावला त्या वेळी लखनौच्या खजिन्यांत कमीत कमी दहा कोटी रुपये शिल्लक होते. ते नासिरउद्दीन ह्यास अनायासें प्राप्त झाले, आणि त्याजबरोबर त्याच्या वडिलाच्या वेळचा