पान:अयोध्येचे नबाब.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग Armaarwww wwwimmmmmwwwwwwwwwwwwww याचे असे एकही कृत्य केले नाही. ह्याचे दोष म्हटले म्हणजे त्याचा गैरशिस्त व उधळेपणाचा खर्च, त्याच्या दरबारांत प्रजेचा अप्रवेश, व त्याचा मीतल्या माणसांवर फाजील विश्वास, आणि त्याची उपचार व मानमरातब ह्यांवर विशेष प्रीति हेच होत."* बिशप हिबर ह्याने केलेले वर्णन हिंदुस्थानांतील एतद्देशीय संस्थानांत नेहमी दृष्टीस पडण्यासारखे असल्यामुळे त्यांत व्याजोक्ति असेल असें मानतां येत नाही. गाझीउद्दीन हैदर ह्यास आपल्या राज्यामध्ये अव्यवस्था होऊन वसूल जमा होत नाही, ही गोष्ट समजली नव्हती असेंही म्हणवत नाही. त्याने बिशप हिबर ह्याजवळ असें बोलून दाखविले की, "मी ब्रिटिश सरकारावर संपूर्ण विश्वास ठेविल्यामुळे माझ्या सर्व अडचणी उत्पन्न झाल्या आहेत. त्यांनी माझें व माझ्या पूर्वजांचें, चांगले सैन्य कमी करण्याबद्दल मन वळवून, आतां राजवाड्याच्या पाहन्यापुरतेही लोक शिल्लक राहू दिले नाहीत. त्यामुळे आम्हांस आमच्या राज्याचा मागील वसूल, दुसऱ्याच्या मदतीवांचून, सक्तीने करितां येत नाही. त्याने आणखी असेंही सांगितले की, "मला कोणतीही राज्यसुधारणा करण्याबद्दल स्नेहभावानें सूचना केली तर मी तिकडे

  • Bishop Heber's Indian Journals, vol. 1, Page 52.

f"He urges that all his difficulties have arisen from his entire confidence in the friendship of the Company. That they induced him and his ancestors to disband an excellent army, till they have become unable, without help, to enforce payment of their ancient revenues,............That he never has refused, and never will refuse, to give the best consideration in his power to any measures of reform which may be, in a friendly manner, proposed to him."-Bishop Heber's Indian Journals.