पान:अयोध्येचे नबाब.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वा.] गाझीउद्दीन हैदर. कानपुराहून लखनौस गेला. त्याने असे लिहिले आहे की, "अयोध्येची राज्यव्यवस्था चांगली नसून सर्व प्रदेश निर्जन झाला आहे म्हणून आम्ही ऐकिले होते, परंतु तशी वस्तुस्थिति नव्हती. शेतकरी लोक लढाऊ जातीचे असल्यामुळे हत्यारे बाळगून होते, तरी ते शांत व विनम्र असे आढळन आले. त्याचप्रमाणे खेडेगांवांतून दुकानें वगैरे व्यवस्थित असून सर्व लोक सुखी व भरभराटीत आहेत असें दिसले. एकंदरीत, सर्व प्रांत लागवड केलेला होता असे पाहून मला साश्चर्य आनंद वाटला." ह्याच प्रवाशानें खुद्द नबाबाची भेट घेऊन त्याचे वर्णन लिहिले आहे, तें वाचनीय असल्यामुळे त्याचा सारांश खाली दिला आहे. "अयोध्येचा नबाब हा जरासा उंच आहे. तो निःसंशय सौंदर्यवान असून त्याचा चेहरा अद्यापि मोहक दिसतो. तो तरुण असून त्याच्या शरीरावर वार्धक्याची छाया अधिक दिसते. त्याचे कुरळे कैंस व कलेदार मिशा अगदी पिकल्या आहेत, व त्याचा वर्ग पूर्वीपेक्षा फार काळसर झाला आहे.........त्यास पोषाकाची फार आवड असून तो त्यांतला मोठा मार्मिक आहे. त्याची चालचर्या फार सभ्य व मनोहर आहे.............त्यास विद्येची अभिरुचि आहे. तो तत्वज्ञान व भाषाशास्त्र ह्यांमध्ये चांगला प्रवीण असून त्याची मोठ्या विद्वानांत गणना केली जाते. त्यास रसायनविद्या व शिल्पविद्या ह्यांचाही थोडा नाद आहे. परंतु, हे राज्यकर्त्यांचे विषय नसल्यामुळे, ते त्यास राज्यकारभारापासून पराङ्मुख करण्यास मात्र कारण झाले आहेत. ह्याच्या गुणांवरून ह्याचे व इंग्लंडचा पहिला जेम्स राजा ह्याचे पुष्कळ सादृश्य जमते. जेम्सराजाप्रमाणे हा स्वभावतः न्यायी व दयाळू आहे व ज्यांचा त्याजपाशी प्रवेश होतो त्यांना तो अति प्रिय आहे. ह्याने कधीही जुकमाचे किंवा अन्या