पान:अयोध्येचे नबाब.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग . ह्यानंतर गाझीउद्दीन हैदर ह्यानें इ० स० १८२६ मध्ये पुनः पन्नास लक्ष रुपये कंपनी सरकारास दिले, त्या वेळी पुनः लॉर्ड आम्हर्ट ह्यांनी त्याची फार प्रशंसा करून त्यास "औदार्याची खाण" ( MIN E OF MUNIFICENCE ) असें नांव दिलें. तात्पर्य, गाझीउद्दीन हैदर ह्याने ब्रिटिश सरकारास साहाय्य करण्यास बिलकूल आळस केला नाही. गाझीउद्दीन हैदर ह्याच्या कारकीर्दीत, अयोध्येच्या इतिहासांत लिहून ठेवण्यासारख्या राजकीय महत्त्वाच्या गोष्टी कांहींच झाल्या नाहीत. जात्या तो प्रबुद्ध, निरुपद्रवी आणि शांत वृत्ति असा होता; परंतु तो स्वतः राज्यव्यवस्थेत दक्ष नसून त्याचे सर्व लक्ष्य सुखोपभोगाकडे होते; त्यामुळे सर्व राज्यकारभार दरबारचे मुत्सद्दी व सादतअल्लीच्या वेळचे प्रांतोप्रांतींचे अधिकारी ह्यांच्यावर अवलंबून होता. अर्थात सर्व सत्ता नौकर लोकांच्या हाती गेल्यामुळे पूर्वीच्या व्यवस्थेत अंतर पडले. सादतअल्लीने 'अमानी' म्हणून जी वसुलाची नवीन पद्धति अमलांत आणिली होती ती बंद पडून, तिच्या जागी पूर्ववत् 'इजारा' पद्धति चालू झाली. त्यामुळे संस्थानचा वसूल कमी होऊन तालुकदार व जमीनदार लोक पुनः प्रमत्त झाले; व ते स्वच्छंदाने वर्ते लागले. त्या योगाने राज्यव्यवस्थेची शिस्त बिघडून सादतअल्लीच्या वेळची शांतता नाहीशी झाली. तथापि त्याच्या कारकीर्दीत अयोध्येची स्थिति अगदी शोचनीय झाली होती असे म्हणता येत नाही. बिशप हिबर नामक पाश्चात्य प्रवासी गाजीउद्दीन हैदर ह्याच्या कारकीर्दीत इ० स० १८२४ मध्ये लखनौस आला होता. त्याने त्या वेळची राज्यस्थिति समक्ष पाहून तिचे वर्णन आपल्या प्रवास ग्रंथांत लिहून ठेविलें आहे, त्यावरून तिचे खरे स्वरूप व्यक्त होते. बिशप हिबर हा इ० स० १८२४ च्या आक्टोबर महिन्यांत