पान:अयोध्येचे नबाब.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ amm अयोध्येचे नबाब. [ भाग कोणतेंच नव्हते. तथापि, नबाबाच्या खजिन्यामध्ये द्रव्य फार असल्यामुळे त्याचा विनियोग करण्याचा प्रसंग त्यास लवकरच आला. इ०स० १८१४ साली जी नेपाळची लढाई चालली होती तिच्या खर्चासाठी पैशाची फार अडचण पडली, तेव्हां लॉर्ड मोयरा ह्यांनी नबाब गाझीउद्दीन हैदर ह्याजपासून शेकडा सहा टक्के व्याजाप्रमाणे एक कोट रुपये कर्ज घेतले; परंतु तेवढ्याने खर्च न भागल्यामुळे पुनः आणखी एक कोट रुपये घेतले, व त्याच्या तारणाकरितां नेपाळच्या पायथ्याचा पहाडी मुलूख व खैरीगड जिल्हा नबाबास गहाण लावून दिला. ह्या दोन कोटी रुपयांशिवाय नबाबाने आपला रिसाला व पुष्कळ हत्ती ब्रिटिश सरकारच्या मदतीस स्वतःच्या खर्चाने पाठविले होते. नबाबाने असें उत्कृष्ट साहाय्य केल्यामुळे गव्हरनर जनरल ह्यांनी त्यावर संतुष्ट होऊन, त्याच्या औदार्याबद्दल व इंग्रजांविषयींच्या निस्सीम भक्तीबद्दल त्याचे फार फार आभार मानिले; क. लवकरच त्याच्या उपकाराची चांगली फेड केली. इ० स० १८१९ मध्ये दिल्लीचा बादशहा इंग्रजांविषयी अराननिष्ठ आहे असे वाटल्यावरून, त्याची बादशहात कमी करून लखनौच्या नबाबास "बादशहा” हे पद द्यावे व त्यास त्याच्या समतोल करावें, ह्या उद्देशाने लॉर्ड हेस्टिंग्ज ह्यांनी गाझीउद्दीन हैदर ह्यास मोठ्या समारंभाने "बादशहा' हे पद दिले व त्याच्या नांवार्ने नाणे पाडण्याची परवानगी दिली. गाझीउद्दीन हैदर " नबाबाच्या" ऐवजी "बादशहा" बनला; परंतु मुसलमान लोकांस हे पदांतर फारसें पसंत न पडून त्यांस दिल्लीच्या सर्ववंद्य गादीचा अपमान झाला, असे वाटले. त्यामुळे गाझीउद्दीन हैदर ह्याच्या नवीन अधिकाराचा दर्जा लखनौच्या बाहेर फारसा प्रसिद्ध झाला नाही. गाझाउद्दीन हैदर ह्यास "बादशहा " केल्यानंतर पुनः ब्रिटिश