पान:अयोध्येचे नबाब.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ वा. गाझीउद्दीन हैदर. (इ. स. १८१४-इ० स० १८२७). सादतअल्ली मृत्यु पावल्यानंतर त्याचा दुसरा मुलगा गाझीउद्दीन हैदर हा गादीवर बसला. ह्याचे व ह्याच्या बापाचे बरेच दिवसांपासून वैमनस्य पडल्यामुळे तो त्याजपासून वेगळा राहत असे. त्यामुळे राजदरबारांतील चतुर व शहाण्या लोकांचा त्याशी विशेष समागम न होतां, तो खुषमस्करी करणाऱ्या व स्तुतिस्तोत्र गाणाऱ्या नौकरलोकांचा अंकित झाला होता. त्यास गादी प्राप्त होतांच त्याने सादतअल्लीच्या वेळचा राजकारस्थानपटु मुत्सद्दी हकीम मेहेंदी ह्यास कमी करून, त्याच्या जागी आपला खानसामा आगा मीर ह्यास प्रधानगिरी सांगितली. हाच आगा मीर पुढे महतमउद्दौला ह्या नांवाने प्रसिद्धीस आला. ह्याने अयोध्येच्या संपत्तीचा पुष्कळ अपहार केला व आपल्या धन्यास सर्व प्रकारे लुटले, असे म्हणण्यास हरकत नाही. असो. गाझीउद्दीन हैदर गादीवर बसला त्या वेळी कर्नल बेली हे लखनौचे रेसिडेंट होते, व लॉर्ड मोयरा ऊर्फ लॉर्ड हेस्टिंग्ज हे हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल होते. लखनौचा नबाब सादतअल्ली ह्याशी इ०स० १८०१ साली जो तह झाला, त्याच्या योगानें नबाबाचा पुष्कळ प्रांत कंपनीच्या ताब्यात गेला होता; व तेव्हांपासून अयोध्येच्या अंतर्गत राज्यव्यवस्थेत ब्रिटिश सरकारास हात घालण्यास काही प्रयोजन न राहून, संस्थानची राज्यव्यवस्थाही सुरेख चालली होती. त्यामुळे गाझीउद्दीन हैदर ह्याच्या कारकीर्दीत संस्थानच्या राज्यव्यवस्थेत फेरफार करण्यास ब्रिटिश सरकारास तादृश्य कारण