पान:अमेरिका पथदर्शक.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५५
प्रश्र्नोत्तरें.

निकल एँजिनियरिंग हा एकच विषय घेतला तरी त्यांत खालीं दिलेल्या अनेक पोट विषयांचा समावेश होतो.
 Machine Shop work-Vertical Milling Machine Motor driven shops-Shop Lighting-Forging-Eletrical Welding-Tool Making Metallurgy-Manufacture of Iron and Steal-High Speed Steal Making-Pattern Making-Founding Work-Automatic caol and ore Handling Appliances-Construction of Boilers-Air Compressing Steam Pumping-Refregirating-Gas Engine Making-Automobile Making Machine Disigning etc.
 ह्यावरून मला इतकेंच दाखवावयाचें आहे कीं, एक विषय घेतला तरी त्यांत किती तरी पोट विषय शिकावे लागतात. माझ्या मित्राची एक हकीकत सांगतों. त्याच्या मोटारीचा काहीं भाग बिघडला होता. तो भाग त्याला सा-या हिंदुस्थानांत मिळाला नाही. अखेर ती मोटार दुरुस्त करण्याकरितां त्याला पॅरिसला पाठवावी लागली. ही आहे आमच्या देशाची स्थिति !
 सांगावयाचा मतितार्थ हा कीं, अमेरिकेस जाऊन एखादा मोठा धंदाच शिकावयास पाहिजे असें नाहीं; एखादें लहानसें काम शिकून आलें तरी बरेंच काम होईल, कारण हस्तकौशल्याची कला, विद्या इत्यादि हरएक बाबतींत अमेरिकन लोक आपल्यापेक्षां बरेंच पुढारलेले आहेत.
 ह्या शिवाय कृषि विद्येच्या शिक्षणाचीहि बरीच आवश्यकता आहे. अमेरिकन कृषिमध्यें बरीच सुधारणा व प्रगति घडून आली आहे. तेथें जाऊन आमचे हिंदी तरुण कृषि विषयक मोठमोठ्या सिद्धांतांचें ज्ञान चांगल्या रीतीनें प्राप्त करून घेऊं शकतील. फळांचे निरानराळे टिकाऊ पदार्थ बनविण्याच्या यंत्रागारांत शिक्षण मिळवून आपल्या देशांत आल्यावर यांना फळांचा व्यवसाय करतां येण्यासारखा आहे. हिंदुस्थानांत कोट्यावधि रुपयांचे आंबे होतात. अमेरिका व युरोपांतील पदार्थ टिनच्या डब्यांतून ज्या प्रमाणें हिंदुस्थानांत पाठविण्यांत येतात,त्या प्रमाणें हिंदुस्थानांतील फळफळावळ डब्यांतून परदेशांत पाठविलें पाहिजे. परंतु हिंदुस्थानांतील फळे हिंदुस्थानांतच सडून जातात. लाहोराहून कलकत्यापर्यंतहि चांगल्या रीतीनें पोहोचवितां येत नाहीत. वाटेंतच फळे सडून त्यांचें पाणी होतें. कांहीं फळे मुक्कामास पोहोंचेपर्यत चांगली