पान:अमेरिका पथदर्शक.pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५४
अमेरिका-पथ-दर्शक

माणें त्यांची वर्तणूक दिसून येत नाहीं. आमचे कित्येक हिंदी तरुण अमेरिका-जपानहून परत आले आहेत. त्यांच्यावर लोकांचा असा आक्षेप आहे कीं, त्यानीं स्वदेशांत येऊन कांहींच कामगिरी केली नाही. परंतु काम करून दाखविण्यास भांडवलाची किती आवश्यकता असते, हें त्यांस माहीत नाही, असें ह्यावरून दिसतें. भांडवलवाल्यांची अशी समजूत आहे कीं, विद्या-कला शिकलेल्या इसमालाच व्यापारी कंपनी चालविण्याचें देखील ज्ञान असतें. परंतु ही फार मोठी चूक आहे. कंपनी चालविण्याची विद्या अगदीं स्वतंत्र आहे. धंद्याची विद्या व कंपनी चालविण्याची विद्या दोन्ही एकच आहेत अशा समजुतीमुळे लोकांचा बराच गैरसमज झालेला आहे. जो मनुष्य कांचकाम शिकून आला आहे किंवा जो रसायन शास्त्राचें उत्कृष्ट शिक्षण संपादन करून आला आहे, त्याला कंपनी उत्तम प्रकारें चालवितां येत नाही; व ह्या तरुण मंडळींचा संबंध येथें ज्यांनी हाडांची काडें करून धन मिळविलें आहे, त्यांच्यांशीं येतो. अर्थात हे धनिक लोक कशाला आपलें धन अशा परिस्थितींत धोक्यांत घालतील. ह्याकरितां हिंदुस्थानांतील धनिक लोकांनीं पाश्चात्य संघशक्तींचें शिक्षण मिळवून, जपान अमेरिकेहून निरनिराळ्या विद्या व कला शिकून आलेल्या हिंदी तरुणांशीं सहकार्य केलें पाहिजे.

 ह्याचकरितां हिंदुस्थानांतील श्रीमंत तरुणांनी अमेरिकेस जाऊन अर्थशास्त्र. व्यापारशास्त्र, इत्यादि संपत्तीविषयक शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. ह्या विषयांत जेव्हां ते (श्रीमंत तरुण) पारंगत होतील तेव्हांच ते विद्या व कलांचें शिक्षण मिळवून आलेल्या इतर तरुण देशबांधवांबरोबर सहकार्य करूं शकतील व अशा रीतीनें देशाचा बराच फायदा त्यांना करून देतां येईल; नाहीतर एकावरच दोन्ही जबाबदाऱ्या टाकल्यास काम करणें तितकेंच अवघड होऊन बसेल.

 आतांपर्यंत बड्या बडया धंद्यांच्या व शास्त्रांच्या शिक्षणाविषयीं आपण विचार केला, परंतु अमेरिकेंत जाऊन अनेक लहान लहान परंतु व्यवहारांत हरघडी उपयोगी पडणाऱ्या कलांचें शिक्षणहि-जोडे, छत्र्या, चाकू, पेन्सिल, ट्रँक, सुटकेस, सायकल, मोटार इत्यादि कलांचे शिक्षण-मिळवितां येईल. आणखी किती लिहावें ? सुतार-काम, लोहार-काम,गवंडी-काम, डिझायनिंग, पंपिंग इत्यादि बाबींच्या शिक्षणाची किती तरी जरूरी आहे. केवळ मॅकॅ-