पान:अमेरिका पथदर्शक.pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५६
अमेरिका-पथ-दर्शक

राहिली तर मोठें नशीब समजावें! अमेरिकेंत 'Refringator'चा (बर्फाच्या गाड्यांचा) फळें वाहून नेण्याच्या कामीं उपयोग करितात. ही पद्धति हिंदुस्थानांतहि सुरू करतां येण्यासारखी आहे. ह्या गाड्यांतून कोट्यावधि रुपयांची फळें एका किना-यापासून अमेरिकेच्या दुस-या किना-यापर्यंत नेण्यांत येतात; तरी तीं फळे सडत नाहींत. असें आपणांला करतां येणार नाहीं काय ? विद्या व उद्योग ह्यांची सांगड ह्यांची सांगड घातल्यास असें कां बरें करतां येणार नाहीं ?
 प्र० ६२--हिंदी विद्यार्थ्यांना सांगण्यासारखी आणखी कांहीं महत्वाची बातमी सांगावयाची राहिली आहे काय ?
 उ०--अमेरिकेंतील 'हिंदुस्थान स्टूडंट्स असोसिएशननें अमेरिकेंत 'शिक्षा' ह्या नांवाचें एक छोटेंसें पत्रक प्रसिद्ध केलें आहे. त्यांतील महत्वाचा कांहीं भाग अमेरिकेत जाऊं इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोईकरितां जशाचा तसा ह्याच पुस्तकांत ह्यापुढें उद्धृत केला आहे. ह्यापासून हिंदी विद्यार्थ्यांना महत्वाची बरीच माहिती मिळेल अशी आशा आहे.

---------