पान:अमेरिका पथदर्शक.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५२
अमेरिका-पथ-दर्शक

आपल्या धनाची नासाडी करितात. हिंदी लोकांनीं अशा शाळा कॉलेजांपासून सावध असावें. अमेरिकेंत असें धोके देणारे बरेंच लोक आहेत. कारण अमेरिका हा एक स्वतंत्र देश असून सर्व लोकांस तेथें मुक्तद्वार आहे. ह्यामुळे युरोपांतील डाकू, चोर, गळेकापू, धूर्त सर्वच लोक अमेरिकेस जाऊन लपून छपून आपले उद्योग चालवितात व तेथील सुरक्षितपणाचा नसता फायदा घेतात.

 माझ्या हिंदी देशबंधूंना माझी अशी विनंति आहे की, त्यांनीं अशा पत्रव्यवहारी शाळा व कॉलेजांपासून सावध असावें. हिपनॉटिझम वगैरे विद्या शिकण्याच्या चक्करांत पडून कित्येक आपले पैसे फुकट घालवितात. अमेरिकेंतील अशा प्रकारच्या संस्था अगदी कुचकामाच्या असून, अशा संस्थांना तेथें कोणी विचारीत देखील नाहीत.

 प्र० ५८--युरोपांतील लोक अमेरिकेस जाऊन अमेरिकन बनतात, हें कसें ? हिंदी लोकहि अमेरिकन होऊं शकतात काय ?

 उ०--अमेरिकेंत गेल्यावर अमेरिकन व्हावेंसे वाटल्यास कोर्टांत आपली अमेरिकन होण्याची इच्छा असल्याचें सांगावें. म्हणजे त्याला तशी इच्छा असल्याबद्दलचा एक कागद देण्यांत येतो. ह्या इच्छा-पत्राकरितां एक डालर खर्च करावा लागतो. ह्या कागदाला 'पहिला-कागद' (First Paper)म्हणतात. पांच वर्षानंतर दोन अमेरिकन साक्षीदारांच्या सह्या घेतल्यावर तो कागद सरकारी कचेरीत सादर करण्यांत येतो. असें केल्यावर पक्का कागद मिळतो. परंतु पांचव्या वर्षी एकाच संस्थानांत राहावयास पाहिजे. असें केलें, तरच तो त्या संस्थानचा रहिवाशी म्हणविला जातो. बहुतेक युरोपियन लोक तेथें गेल्याक्षणीच पहिला कागद मिळवून घेतात. असें केलें म्हणजे नोकरी मिळविण्यास त्यांस अडचण पडत नाही. फौजेतहि त्यांचा प्रवेश सहज होऊं शकतो.

 प्रo ५९--अमेरिकेच्या दान-विभागासंबंधींची माहिती कळावी अशी आमची इच्छा आहे; म्हणून अमेरिकन लोक दानाचा उपयोग कसा काय करतात ह्या संबंधीची माहिती सांगण्याची कृपा करावी.

 उ०--आपल्याला ही माहिती खालील ठिकाणाहून मिळेल---
  Charities Publication Committee
   105 East, 22nd St. New York City.