पान:अमेरिका पथदर्शक.pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५३
प्रश्र्नोत्तरें.

 प्र० ६०--अमेरिकेस न जातां येथेंच राहून कांहीं शिकावें, अशी आमची इच्छा आहे ह्याकरितां काय करायला पाहिजे ?
 उ०--आपल्याला राजकारणशास्त्र, विज्ञान, समाज-शास्त्र, साहित्य-शास्त्र, इतिहास इत्यादि विषय शिकावयाचें असल्यास आपण खालील पत्यावर लिहावें:-
  The University of Chicago,
   Correspondence Study Dept,
    U. of C. (Div. T.) Chicago, Ill., U. S. A.
 आपल्याला कृषिशिक्षण घ्यावयाचें असल्यास खालील पत्यावर लिहावें---
  The Home Correspondence School,
   185 Spring field Mass, U. S. A.
 सुतार काम किंवा घर बांधण्याचें काम शिकावयाचें असल्यास खालील दिलेल्या पत्यावर पत्र व्यवहार करावा.
   American School of Correspondence,
     Chicago Ill U. S. A.
 प्र० ६१-कोणते शिक्षण घेण्याकरितां हिंदी विद्यार्थी अमेरिकेस गेल्यास आपल्या देशाचा अधिक फायदा होइल, असें आपणांस वाटतें ?
 उ०-हा प्रश्न फार महत्वाचा आहे. व ह्या बाबतींत बराच मतभेद दिसून येण्याचा संभव आहे. माझ्या मतें अमेरिकेस जाऊन अमेरिकेंतील शिक्षणपद्धतीचें शिक्षण मिळविलें पाहिजे. हा विषय शिकविणारे चांगलें चांगलें विद्वान अध्यापक कोलंबिया युनिव्हर्सिटीत आहेत. तेथें जाऊन आमच्या विद्यार्थ्यांनी चार पांच वर्षे परिश्रमपूर्वक ह्या विषयाचें शिक्षण संपादन केलें पाहिजे.
 ह्या व्यतिरिक्त अर्थशास्त्र, राजकारणशास्त्र, व्यापार उदीम संबंधी विद्या, बँकिंग इत्यादि विषयांचें अत्यंत परिश्रम करून शिक्षण मिळविल्यास आपल्या देशाचा फार फायदा होईल. आम्हांस मोठमोठ्या व्यापारी मंडळ्या स्थापन करावयाच्या असल्यास असल्या मंडळया चालविण्याची पात्रता शिक्षणाच्या संस्कारानें आपल्या अंगीं बाणविली पाहिजे. आमच्यामध्यें एक प्रमुख दोष हा कीं, आम्ही संघशक्तीचें ( Organization ) महत्व जाणत नाही. यदाकदाचित आपल्यापैकीं कोणास हें महत्व कळलें असलें तरी त्याप्र-