पान:अमेरिका पथदर्शक.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३०
अमेरिका-पथ-दर्शक

लींत आपण राहतो, ती खोली स्वच्छ व साफसूफ ठेवण्याकडे आपले लक्ष असलें पाहिजे. मध्येंच इकडे तिकडे थुंकू नये. अमेरिकेंत सकाळी उठल्यावर स्नान करण्याची पद्धति नाहीं. सर्व घर आपल्या ताब्यांत असेल तर गोष्ट वेगळी. अशा स्थितींत हवें तेव्हां स्नान करण्यास पूर्ण मुभा असते. असें नसल्यास, दोनप्रहरीं किंवा रात्रीं निजण्यापूर्वी आंघोळ करावी. प्रातःकाळी शौचास वगैरे जावयाचें असल्यास हळुहळु व पाय न वाजवितां जावें, म्हणजे कोणाच्या झोपेंत तुमच्या वर्तनामुळें व्यत्यय येणार नाही. स्वतःच्या सोईप्रमाणें दुस-यांच्या सुखसोईंकडेहि आपण लक्ष पुरविलें पाहिजे. मी खोलीचें भाडें देतों तेव्हां हवें तसें वागण्यास मला कोणती हरकत ? असें समजूं नये. गैरशिस्त रीतीनें वागण्या-या इसमास त्याचक्षणी घरांतून घालवून देण्यांत येतें
 स्त्रीयांशीं बोलतांना एकहि असभ्य शब्द न उच्चारण्याची खबरदारी घ्यावी. स्त्रियांशीं केव्हांहि तंटाबखेडा करूं नये. अमेरिकेंतील स्त्रीपुरुष त्या देशांतील रिवाजाप्रमाणें नम्रपणें व हंसत हंसत भाषण करतात. त्यांच्या अशा वागण्याचा कोणी भलतांच अर्थ करूं नये! बोलतांना एकादा शब्द न कळल्यास I beg your pardon असें म्हणून फिरून विचारावें. एकाद्यानें आपली खाली पडलेली वस्तु उचलून दिली तर लागलींच Thank you very much असें म्हणून उपकाराची फेड करावी. असें न म्हटल्यास तिकडील लोक आपल्याला असभ्य समजतात, व आपल्याशीं फिरून कधीं भाषण करीत नाहीत. ह्या गोष्टी दिसावयास क्षुल्लक असल्या तरी अशाच गोष्टींवरून त्या देशांत मनुष्याची सभ्यता ठरविण्यांत येते.
 कोणाची भेट घेण्यास जावयाचें असतां किंवा शाळा कालेजांत जातांना नेहमीं कॉलर, नेकटॉय, कोट,पँट घालून व केंस नीटनेटकें करून जावें. बूट साफ असावा. व हजामत केल्याशिवाय कोणास भेटावयास जाऊं नये. पोषाख वगैरे बाबतींत कोणतीहि कमतरता ठेऊं नये. कपडे वगैरे नेहमीं स्वच्छ व नीट शिवलेले असावेत. ह्या बाबींकडे तिकडे फार लक्ष पुरविण्यांत येतें. आपल्या देशांतील सभ्यतेचे नियम निराळ्या प्रकारचे असतात. ह्याकरितां अमेरिकेतील पाश्र्चात्य सभ्यतेचे नियम हिंदी विद्यार्थ्यांस माहित असणें अत्यंत आवश्यक असतें.
 आता शौचविधिसंबंधी माहिती सांगतों. अमेरिकेंतच काय, पण सर्व पाश्र्चात्य राष्ट्रांत गुदमार्ग स्वच्छ करण्याकरतां आपल्या देशांतील रिवाजाप्रमाणें