पान:अमेरिका पथदर्शक.pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२९
प्रश्र्नोत्तरें.

 उ०-अमेरिकन लोक इंग्रजी त-हेचा पोशाख करतात; परंतु त्यांच्या फॅशनमध्यें थोडा फरक आहे. ह्याकरितां हिंदुस्थानांतून अमेरिकेस जाणा-या इसमांनीं येथून फारसे कपडे तयार करवून घेऊं नयेत. तेथें गेल्यावर तयार केलेले कपडे विकत घेतां येतात. अमेरिकेंत राहण्याकरितां खोल्या भाडयानें मिळतात. कांहीं खोल्यांचे दरमहा भाडें २४ रुपये असतें; तर कांहींचें ३० रुपये असतें. ज्या प्रकारची खोली असेल त्या प्रमाणें भाडें कमीजास्त पडतें. जे विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या वसति-गृहांत राहूं इच्छितात, त्यांना अधिक भाडे द्यावें लागतें. एखाद्या विश्वविद्यालयाचे वसति-गृहांत भाडे कमी पडतें. निरनिराळ्या विश्वविद्यालयांत खोल्यांच्या भाडयांचा दर व तद्वतच त्यांतील सोई कमीज्यास्त असतात. ह्या खोल्यांत स्वयंपाक करावयाची व्यवस्था नसते, अर्थात विद्यार्थ्यांना विश्वविद्यालयाच्या भोजन-क्लबांत जेवण्याकरितां जावें लागते; किंवा शेजारीं असणा-या दुस-या एखाद्या हॉटेलांत विद्यार्थी आपआपली जेवण्याची व्यवस्था करून घेतात.

 कपडे धुण्याला प्रत्येक कपडयामागें पांच आणे, कॉलरचे प्रत्येकी पांच पैसे, आंतल्या गंजीफ्राकचे प्रत्येकी चार आणे, असे पडतात. हजामत स्वतःच करण्यास शिकलें पाहिजे. न्हावी हजामतीचें (दाढी करण्याचे) आठ आणे किंवा १५ सेंट घेतो. केंस कापण्याचें तेरा आणे द्यावें लागतात. इतर खर्चहि हिंदुस्थानांतील त्याच प्रकारच्या खर्चापेक्षा किती तरी पटीनें अधिक असतात. महिंन्यास कमीत कमी ६५ रुपये खर्च येतोच. इतक्या रकमेंत काटकसरीनें राहिल्यास सुशील विद्यार्थी अमेरिकेत आपला चरितार्थ चालवूं शकतो.
 खोली पहावयाची असल्यास दैनिक वर्तमानपत्रें वाचण्याचा सराव ठेविला पाहिजे.त्यामध्यें भाड्यानें द्यावयाच्या खोल्यांच्या जाहिराती असतात. गल्ल्यांतून हिंडून फिरूनहि खोल्यांचा तपास करतां येतो. चालतांना दोन्ही बाजूकडे पाहात गेलें पाहिजे. जी खोली भाड्यानें द्यावयाची असते, तिच्या दारावर Rooms for rent-Furnished-unfurnished-House to let, इत्यादि शब्द लिहिलेल्या पाट्या लटकविलेल्या असतात. जी खोली भाड्याने द्यावयाची असेल त्या खोलीच्या दारावरील बटन दाबावी म्हणजे घरची मालकीण येऊन दार उघडते; तिला माहिती विचारून घ्यावी. तिच्याशी सभ्यतेने भाषण करून खोलीच्या भाडयाचा दर निश्र्चित करावा. ज्या खो-