पान:अमेरिका पथदर्शक.pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३१
प्रश्र्नोत्तरें.

पाण्याचा उपयोग न करतां, कागदाचा उपयोग करतात.पाण्याचा तांब्या बरोबर शौचकूपांत नेण्याची तिकडे पद्धत नाहीं. शौचकूपाच्या खोलींत एक स्टूल असतो. पँट खाली सरकवून मनुष्य त्या स्टूलावर खुर्चीवर बसल्याप्रमाणें बसतो. मलोत्सर्ग-क्रिया संपली म्हणजे, कागदाच्या केसमधून एक कागद फाडून तो गुदद्वार स्वच्छ पुसतो. इतकें झाल्यावर साखळी ओढली कीं, जमिनीच्या खालीं मळ वाहून नेण्याकरितां मोठमोठ्या नाल्या असतात, त्या नाल्यांमध्यें सर्व मळ जाऊन पडतो. नाल्यांतून मळ एखाद्या नदीत किंवा समुद्रांत किंवा गांवापासून लांब जागी वाहून नेण्यांत येतो. हे कागद निराळ्याच प्रकारानें केलेलें असतात. ह्यास ' Toilet paper' हें नांव आहे. हा कागद फार हलका असतो. घराची मालकणि साबण शाचै-पत्रें वगैरे सामान देतें. स्टूलवर दोन्हीं पाय ठेवून केव्हाहि बसूं नये. खाली पाय सोडून आपण स्लटूवर बसतो त्याप्रमाणें त्यावर बसावें. केवळ लघवी करावयाची असेल तेव्हां स्टूलवरची लाकडी चौकट वर उचलावी व मूत्रोत्सर्जन करावें. 'शौचकूप कोठें आहे, असें विचारावयावचें असतां, Water closet किंवा Lavatary कोठें आहे ? असें विचारावें,

 राहण्यासवरण्यासंबंधी ह्या थोडया सूचना केल्या आहेत. ह्यांपासून माझे हिंदी बांधव योग्य तो बोध घेतील, अशी मला उमेद आहे.

 प्र० २३--अमेरिकन लोक हिंदी विद्यार्थ्यांबरोबर कशा रीतीनें वागतात?
 उ०--शाळा कॉलेजें किंवा विश्र्वविद्यालयांमध्यें अमेरिकन विद्यार्थी व अध्यापक हिंदी विद्यार्थ्यांबरोबर चांगल्याप्रकारचें वर्तन ठेवतात. कोणताहि प्रकारचा पक्षपात वगैरे करीत नाहींत.इतर अमेरिकन लोकंहि हिंदी विद्यार्थ्यांशी चांगल्या त-हेनें वागतात. परंतु युरोपियन् कुली व निरनिराळ्या देशांतून अमेरिकेंत येणारे गोरे लोक हिंदी लोकांचा द्वेष करतात. ह्याचें कारण स्पष्टच आहे. हे लोक फार सकुंचित बुद्धीचे असतात. त्यांच्या देशांत त्यांना कांहीं अनुभव आलेला नसतो. अमेरिकेंत गेल्यावर हे लोक साहेबी ऐट आणून मोठ्या दिमाखानें समाजांत वावरतात. कुली लोकांत तर आपल्या हिंदी लोकांविषयीं पक्षपातबुद्धि नेहमींच जागरूक असतें, ह्यामुळें मला फार हाल सहन करावे लागले. कारण मला आपला चरितार्थ चालविण्याकरितां द्रव्यार्जन कराव लागे, तेव्हां मला मजूर लोकांबरोबर काम करण्याचा प्रसंग येई. मजू-