पान:अमेरिका पथदर्शक.pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३
प्रश्र्नोत्तरें.

होतो तेव्हां एक वर्ष पावेतों मी उमेदवार विद्यार्थी होतो.त्यानंतर सर्वसाधारण विद्यार्थी झालों. ह्याप्रमाणें ज्या हिंदी विद्यार्थ्यास अमेरिकेंतील विश्वविद्यालयांत प्रवेश हवा असेल, त्यांनीं कमीत कमी म्याट्रिक्युलेशनची परीक्षा पास करून तेथें जावें. मॅट्रिक न होतां ते तिकडे गेल्यास, त्यांना मॅट्रिकची परीक्षा तेथें पास करावी लागेल. विद्यार्जनेच्छु इसम अमेरिकेंत विद्याविन्मुख मुळीच राहूं शकत नाहीं.अर्थातच हिंदी विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण अमेरिकेंत मिळविणें कठीण जात नाहीं.

 प्रश्न १०-बरोवर एखादे सर्टिफिकेट घेऊन जाण्याची आवश्यकता आहे कीं काय?

 उत्तर-होय, जो विद्यार्थी मॅट्रिक पास झाला असेल त्यानें हेडमास्तरचें वर्तणुकीवद्दल प्रमाणपत्र व आपल्या शाळेचा वार्षिक अहवाल बरोबर घेऊन जावा, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षाला हिंदुस्थानांतील शाळेची स्थिति कळून येईल. जो विद्यार्थी इंटर पास झाला असेल किंवा इंटरपर्यंत शिकला असेल त्यानें आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपालचें शिफारसपत्र(Certificate) बरोबर घ्यावें. त्यांत असें लिहवून घ्यावें कीं, मी अमुकविषयाचा अमुक तास अभ्यास केला असून, त्यांत इतके प्राविण्य मिळविलें आहे. असें प्रमाणपत्र मिंळविल्यानें अमेरिकेंत पदवी मिळविणें सोईचें होतं. जे विद्यार्थी मेट्रॅिकची परीक्षा नापास झाले असतील त्यांनीं आपल्या शाळेच्या हेडमास्तरांकडून पास झालेल्या विषयांचा किती किती तास अभ्यास केला आहे, हें लिहवून घ्यावें. कारण अमेरिकेंत अभ्यासाच्या तासांवरून गूण मिळत असतात. उदाहरणार्थ बी. ए. ची पदवी मिळविण्याकरितां १२८ Credits ची जरुरी असते. एका सहामाहींत विद्यार्थी सोळा Credits मिळवू शकतो. १६ तास प्रत्येक आठवड्यांत अभ्यास केला म्हणजे एका सहामाहीचे १६ Credits धरण्यांत येतात. ह्याप्रमाणें एका वर्षांचे ३२ Credits झाले. ह्या हिशेबानें चार वर्षांत बी. ए. ची पदवी मिळवितां येतें. हुशार विद्यार्थी केवळ तीन वर्षांतही बी. ए. होऊं शकेल. त्याला दर आठवड्यास सोळापेक्षां अधिक तास अभ्यास करितां येईल. परंतु असें करण्याकरितां युर्निव्हर्सिटीच्या अध्यक्षाची खास परवानगी मिळविली पाहिजे.