पान:अमेरिका पथदर्शक.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२
अमेरिका-पथ-दर्शक

टपलेले असतात. अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करणें अवश्य असतें. यंगमेन्स ख्रिश्चन असोसिएशन कडून व्यवस्था न केल्यास एखाद्या शिपायास माफक दराच्या उपहारगृहाचा पत्ता विचारावा अशा उपहारगृहांत रोज दीड रुपया किंवा ५० सेंटपर्यंत भाडें पडतें. इतकें भाडें दिल्यानें राहण्याकरितां चांगली खोली मिळूं शकते. फार तर ७५ सेंटही रोजचें खोलीचें भाडें पडेल. ह्यामध्यें जेवण्याचा समावेश होत नाहीं. मांस भक्षण न करणा-या इसमानें नुसतीं फळें किंवा दूधपोळी खाऊन राहण्याची संवय करावी. जोंपर्यंत चांगलेंसे शाकाहारी उपहारगृह मिळत नाहीं, किंवा स्वतःच स्वयंपाक करून राहण्यालायक खोली मिळूं शकत नाही, तोंपर्यंत वरीलप्रमाणें पदार्थ खाऊन राहण्याची संवय केली पाहिजे. कोणावरही एकदम विश्वास टाकू नये. कारण, थोड्या निष्काळजीपणाचा फायदा घेऊन सर्वस्वीं नागविण्यास टपून बसलेलें अनेक फसवे लोक ह्या देशांत आहेत. अनोळखी इसमानें नेहमी आपलें कान, व डोळे उघडे ठेवून व्यवहार केला पाहिजे. अमेरिकेंतील प्रत्येक गल्लीच्या कोंप-यावर त्या गल्लीचें नांव लिहिलेलें असतें. घरांवर नंबरहि सुंदर व ठळक अक्षरांत लिहिलेले असतात. जेव्हां कांहीं विचारावयाचें असेल, तेव्हां नेहमीच पोलीस शिपायास विचारावें. आपल्याजवळ किती द्रव्य आहे, हें कोणासहि कळू देऊं नये. दुकानदारांसमोर आपली पैशाची पिशवी केव्हांहि सोडू नये. कांहीं रुपयांची जरूरी पडल्यास, कोणी पाहणार नाहीं अशा ठिकाणी बसून पैशाची पिशवी सोडावी व खरेदी करण्याकरितां जितक्या पैशांची जरूरी असेल, तितकें पैसे वर काढून ठेवावें.
 प्रश्न ९-अमेरिकेंतील विश्वविद्यालयांत प्रवेश मिळण्याकरतां किती शिक्षणाची जरूरी असते ?
 उत्तर-हॉयस्कूलपर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यास अमेरिकन युनिव्हर्सिटीत प्रथम उमेदवार-विद्यार्थी (Special student) म्हणून दाखल करण्यांत येतें. त्याचे ज्या विषयाचें शिक्षण कमी राहिलें असेल, त्या विषयाचें शिक्षण त्याला अगोदर पूर्ण करावें लागतें. युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळविण्यास इंग्रजी शिवाय दुस-या एखाद्या युरोपियन भाषेत पुरेसें गुण मिळाले पाहिजेत. त्याशिवाय तो विद्यार्थी युनिव्हर्सिटीचा सर्व साधारण विद्यार्थी (Regular student ) होऊं शकत नाहीं. मी जेव्हां शिकागो युनिव्हर्सिटीत शिकत