पान:अमेरिका पथदर्शक.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अमेरिका-पथ-दर्शक

होतें. मी तर निर्धार केला कीं, प्राण गेला तर बेहतर पण अमेरिकेस गेल्याशिवाय राहणार नाहीं. मी आपल्या मित्रांनांहि भेंटलों, व त्यांना आपले विचार कळविले; ते बिचारे मला कशी मदत करुं शकणार? माझ्याबद्दल सहानुभूति दर्शवून त्यांनीं मला उत्तजन मात्र दिलें.
 आपल्या घरच्या मंडळींच्या व इतर सगेसोय-यांच्या भेटी व समाचार घेऊन मी काशीला परत आलों. ह्यानंतर अमेरिकेच्या प्रवासाच्या विचारांत माझा एक एक दिवस जाऊं लागला. जेथें त्यासंबंधीं थोडी बहुत माहिती मिळेल, तेथें जाऊन मी आपल्या डायरींत माहिती टिपून घेऊं लागलों.मी अमेरिकेचा इतिहास वाचला व अमेरिकेच्या जलमार्गाचें अॅटलासवरून (नकाशाचें पुस्तक) सूक्ष्मपणें अवलोकनहि करून ठेविलें;व जोंवर शक्य होतें तोंवर साधनसामुग्रीहि जमविली व १९०५ च्या जानेवारी महिन्यांत काशी सोडावयाचें निश्चित केलें.
 माझ्याजवळ अवघे पंधराच रुपये होते. हेंच माझें भांडवल. परंतु एकच गोष्ट सर्वांत विशेष होती. ती म्हणजे 'दृढनिश्चय' ही होय. ईश्वरावर सर्व भार टाकून निर्धाराबरहुकूम वागण्यास मी आरंभ केला; व जानेवारीच्या पहिल्या तारखेस कोणास कांहीं न कळवितां काशीहून कूच केलें. काशी सोडतांना काशी नगरीला शेवटचा नमस्कार करावयाचे वेळीं माझ्या मनांत जे विचार उद्भवले, त्यांचे वर्णन करणें कठीण आहे. जेंव्हां गाडी डफरीन पूलाच्या पलीकडे गेली तेव्हांचे काशीचें प्रभातसमयीचें मनेाहर दृश्य पाहून माझे डोळे पाण्यानें डबडबून आले, व तशाच स्थितींत सद्गदित कंठानें त्या पुण्यनगरीला शेवटचा प्रणाम करून, मी काशीचा निरोप घेतला.
 ह्या प्रकारें दु:खपूर्ण अंत:करणानें काशीपासून मी दूरदूर जाऊं लागलों. काशीहून अलाहाबाद, अलाहाबादेहून जबलपूर व जबलपुराहून मुंबईस मी गेलों, व तेथें मी आर्यसमाजाचे ठिकाणावर बि-हाड ठेविलें. माझ्या पूर्वीच माझे मित्र रा. सोमदेव अमेरिकेस जाण्याच्या इराद्यानें मुंबईस आले होते. त्यांची भेट होऊन आम्हीं दोघेही अमेरिका-प्रवासाच्या विचारांत गुरफटून गेलों. आम्ही दिवसभर मुंबई शहरांत इकडे तिकडे हिंडत असू, व मुंबई बंदरावर जेथें जहाजें उभी राहतात तेथें आम्ही रोज जाऊन आपल्या दैवाची परीक्षा पहात असुं परंतु,कोणत्याही प्रकारचें काम न मिळाल्यामुळे आम्ही आपलें कम-