पान:अमेरिका पथदर्शक.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मी अमेरिकेस कसा पोहोंचलों

नशीब बरोबर घेऊन संध्याकाळीं रोज आपले बि-हाडी परत येत असू. जहाजावर आम्हांस नोकरी मिळाली नाही, कारण तेथें अनुभवी नावाड्यांची जरूरी हो0ती. अर्थात आमच्या सारख्या अडाणी इसमांची तिथें काय दाद लागणार ? अशा प्रकारें आमचे कित्येक दिवस फुकट गेले व आम्हीं निराशेच्या गर्तेत कोलमडून पड़लों.
 सोमदवनें तर निराशेच्या आधीन होऊन अमेरिकेस जाण्याचा उद्योग करण्याचें सोडून दिलें; परंतु मीं आपलें धैर्य खचूं दिलें नाहीं. मी असा विचार केला की, कांहीं काळ देशांत इकडे तिकडे दौरे काढून थोडी बहुत देशसेवा करावी, व ह्या काळांतच कदाचित मनोरथ सिद्धीचा एखादा मार्ग सुचून आपलें काम तडीस जाईल; व ईश्वरकृपेनें झालेंहि असेंच; चार महिने गुजराथ काठेवाडांत दौरे काढले व यथाशक्ति जनसेवा करण्यास आरंभ केला. शेवटीं शेवटीं एकदोन गृहस्थानीं माझ्याबद्दल सहानुभूति दाखविली. त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. विशेषतः काठेवाडांतील श्रीमंत जेठालालजींनीं मला जी उदारतेनें मदत केली त्याची आठवण मी केव्हांही विसरणार नाहीं.
 इतके झालें तरी अमेरिकेच्या प्रवासास लागणारें पुरेसें द्रव्य मजजवळ जमलें नाही. माहिती मिळवितां मला समजलें कीं, अमेरिकेस जाण्यास कमीत कमी ५०० रुपय लागतात. माझ्याजवळ पुरते तीनशेंही रुपये नव्हते. न्यूयार्कद्वारें जाण्यापेक्षां हांगकांग मार्गानें जाणें मला विशेष सोईचें वाटलें, हांगकांगकडून गेल्यास पैसे मिळविण्याला संधि मिळेल, व काम करून पुरेसें द्रव्य मिळाल्यावर अमेरिकेस जातां येईल, असा विचार करून मी कलकत्यास जावयास निघालों. व तेथून अमेरिकेस समुद्र मार्गानें जाण्याचें ठरविलें. कलकत्यास गेल्यावर अमेरिकेस जाऊं इच्छिणा-या एका हिंदी विद्यार्थ्याशीं माझी मैत्री जडली. त्याचेजवळ अमेरिकेस जाण्यास पुरेसें द्रव्यही होतें. आम्हीं दोघांनी मिळूनच सर्व सामान खरेदी केलें. माझ्याजवळ तीन कांबळी होत्याच. शिवाय मी एक लांब ओव्हरकोट व काळ्या बनातीचा एक सूट तयार करविला. माझ्याजवळ पुस्तकांची मोठी पेटी होती. ती बरोबर नेण्याचें मी ठरविलें. मी कोणतीही पुस्तकें नेली नसती तर विशेष चांगलें झालें असतें. मला पुस्तकें व इतर सामानाकरितां फार त्रास सोसावा लागला.अमेरिकेस जाणा-या प्रवाशाजवळ जितकें कमी सामान