पान:अमेरिका पथदर्शक.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६ )


प्रसिद्ध केली आहेत. त्यांची सर्वच पुस्तकें राष्ट्रीय विचारांना चालना देणारीं अर्थात देशभक्तिपर, स्फूर्तिदायक, बोधप्रद व अभिनव विचारांनीं भरलेलीं असून त्यांतील भाषा जोरदार, चित्ताकर्षक व चटकदार आहे. अशा महनीय व्यक्तीच्या वाङ्मय संपत्तीपासून महाराष्ट्रीयांना बराच फायदा करून घेतां येण्यासारखा आहे,असें वाटल्यावरून,आम्ही गेल्या उन्हाळ्यांत अमेरिका पथ प्रदर्शकअमेरिका दिग्दर्शन ह्या स्वामीजींच्या दोन पुस्तकांची मराठींत रूपांतरें केली व हीं रूपांतरें प्रसिद्ध करण्याबाबत स्वामी सत्यदेवांची परवानगी मागितली व आनंदाची गोष्ट ही कीं, त्यांनी ती मोठ्या आनंदानें दिली.पुस्तक छापण्याचे काम सुरुं असतां, 'स्वामीजींचे सर्वच ग्रंथ तेजस्वी आहेत. ते मराठीतून प्रसिद्ध झाल्यास मराठी रसिकांस ज्ञानप्राप्तिबरोबरच मनोरंजनहि करतां येईल' असा विचार मनांत आला; व या विचाराप्रमाणें आम्ही आपलें मनोगत स्वामीजींना कळविलें व त्यांनी त्यांच्या सर्वच (२-३ ग्रंथ सोडून) ग्रंथांचा अनुवाद करण्यास आम्हांस परवानगी दिली. ह्या अनुज्ञेमुळे आमचे कार्यक्षेत्र अधिक विस्तृत होऊन त्याबरोबरच जबाबदारीहि वाढली व हें प्रकाशनाचे कार्य बिनहरकत व सुव्यवस्थितपणें करतां यावें म्हणून, 'अभिनव ग्रंथमाला' सुरूं करण्याचें आम्हीं निश्र्चित केलें; व सुदैवानें आज मालेचे प्रथम पुष्प ‘अमेरिका पथ दर्शक' वाचकांस सादर करण्यांत येत आहे.
 मालेच्या पहिल्या पुष्पांतच सत्यग्रंथमालेचे चालक स्वामी श्रीसत्यदेव ह्यांचे थोडे विस्तृत चरित्र देणें अवश्य होतें. चरित्र मिळविण्याची आम्ही बरीच खटपटहि केली, परंतु हें पुस्तक छापून होईपर्यंत स्वामीजींचे चरित्र आमच्या हातीं न पडल्यामुळे तूर्त त्रोटक चरित्रावरच वाचकांनी आपली जिज्ञासा तृप्त करून घेणें अवश्य आहे. चरित्रविषयक माहिती लवकरच पुरविण्याचें लाहोरच्या एका सद्गृहस्थानीं आश्र्वासन दिलें असून पुढील पुस्तकाच्या आरंभीं ही माहिती देतां येईल असा भरंवसा वाटतो.
 बालब्रह्मचारी स्वामी श्रीसत्यदेव हे पंजाब प्रांतांत लुधियांना गांवी इ०स० १८८० त जन्मले. त्यांचे वडील थोड्या पगारावर सरकारी नोकरीत कामावर होते. त्यांचे कुटुंब मोठं असल्यामुळे साहजिकच त्यांचे घरीं खर्चाची नेहमी तंगी असे. तथापेि लाहोर येथील अँग्लोवेदिक हायस्कूलांत अभ्यास करून सत्यदेव १८९७ साली विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले. ह्याच वर्षी