पान:अमेरिका पथदर्शक.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



संपादकीय मनोगत.



 उत्तर हिंदुस्थानांत ज्या थोड्याफार थोर व्यक्ति आज विद्यमान आहेत त्यांत स्वामी श्रीसत्यदेव ह्यांचीहि प्रामुख्यानें गणना होते. स्वामीजींचे कार्य राजकीय, सामाजिक व धार्मिक अशा तीन प्रकारचे असून हिंदी प्रांतांत ते हल्ली संचार करीत करीत लोकजागृतीचें कार्य करीत असतात. वाङ्मयसेवेचेंहि कार्य त्यांनीं अखंड चालविलें असून परप्रांतीय लोकांस त्यांच्याशीं परिचय करून घेण्यास त्यांचे वाङ्मय हें एक फार चांगलें साधन आहे. बेळगांवचे सुप्रसिद्ध वकील श्रीयुत नागेश वासुदेव गुणाजी यांनीं स्वामीजींच्या 'अमेरिकन विद्यार्थीयोंके परिश्रम ' ह्या सुंदर पुस्तकाचें मराठींत रूपांतर करून व तें मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळींकडून प्रसिद्ध करवून प्रथमच स्वामीजींचा मराठी वाचकांना परिचय करून दिला आहे. 'अमेरिकेंतील गरीब विद्यार्थी?' हें पुस्तक वाचूनच आम्हांस स्वामी सत्यदेवांची इतर पुस्तकें वाचण्याची जिज्ञासा झाली व ह्या जिज्ञासेचे प्रत्यंतर आज 'अमेरिका पथ दर्शक' हें पुस्तक प्रसिद्ध करण्यांत होत आहे. स्वामी सत्यदेव ह्यांनीं अमेरिका व जर्मनीसारख्या अर्वाचीन सुसंस्कृत राष्ट्रांत उदंड संचार करून आपल्या विविध विषयांच्या ज्ञानांत व अनुभवांत भर घातली आहे. राष्ट्रीय विचारसरणी व सडेतोड व बाणेदारवृत्ति ह्या गुणांचा स्वामीजीमध्यें सुंदर मिलाफ झाला असून एककल्लीपणा व एखाद्या गोष्टीचा फाजील अभिमान बाळगणें ह्या वृत्तींचा त्यांच्या ठिकाणीं सर्वस्वीं अभाव दिसून येतो.
 अमेरिकेंतून स्वदेशांत परत आल्यावर लोकसेवा व मातृभाषेची सेवा ह्या दोन उद्देशांना अनुसरून त्यांनीं 'सत्यग्रंथमाला 'गुंफण्यास सुरुवात केली. अमेरिकेंतील स्वावलंबी विद्यार्थी, अमेरिकेंतील शिक्षणपद्धति, तेथील खाण्यापिण्याची पद्धति, प्रवासातील अडचणी, अमेरिकेंतील अनुभव वगैरेंची माहिती हिंदी तरुणांना असणें इष्ट आहे म्हणून 'अमेरिकाके निर्धन विद्यार्थीयोंके परिश्रम', ‘अमेरिका पथ प्रदर्शक', 'अमेरिका दिग्दर्शन','अमेरिका भ्रमण' ही पुस्तकें त्यांनीं प्रथमतःच प्रसिद्ध केली व त्यानंतर अनेक इतर उपयुक्त व सुंदर पुस्तकें प्रसिद्ध केली. आजवर सदरहू मालेतर्फे त्यांनी १८-१९ पुस्तकें