पान:अमेरिका पथदर्शक.pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७ )

त्यांच्या लग्रासंबंधीं घरच्या वडील मंडळीत चर्चा सुरूं झाली परंतु स्वामी सत्यदेवांनीं लग्न करून घेण्याचें साफ नाकारिलें. त्यांची नाखुषी असतांहि वडिलांच्या आग्रहास्तव व कौटुंबिक अडचणींना धैर्यानें तोंड देतां यावें म्हणून, त्यांनीं नोकरी पत्करिली.परंतु सहा महिन्याच्या आंतच त्यांनीं नोकरीस कायमचा रामराम ठोकला. तदनतंर संस्कृतचे अध्ययन करण्याकरितां ते बनारसला गेले. १८९९ सालीं मातोश्रींच्या आजारीपणामुळे त्यांस लाहोरास परत जावें लागलें. लाहोरास असतां ते तेथील अँग्लोवेदिक कालेजांतच दाखल झाले. मातोश्रींचा दुखण्यांतच दुर्दैवानें अंत झाला. त्यानंतर १९००त त्यांनीं कॉलेज सोडलें; व फिरून बनारस क्षेत्रीं जाऊन संस्कृतचें अध्ययन करण्यास त्यांनीं सुरुवात केली. बनारसच्या हिंदु कॉलेजांतहि त्यांनीं कांहीं काळ अध्ययन केलें व हें सर्व स्वतःच्या हिंमतीवर व मनगटांतील बळाच्या जोरावर. १९०४ सालीं त्यांनीं हिंदु कॉलेज सोडलें व अनेक हालअपेष्टा सोसून व अडीअडचणींतून मार्ग काढून ते अमेरिकेंत दाखल झाले. त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासाची हकीकत ह्याच पुस्तकांत दिली असून तेथील निवासांची व तेथें आलेल्या विविध अनुभवांची माहिती त्यांनी आपल्या 'अमेरिका दिग्दर्शन' व 'अमेरिका भ्रभण' ह्या पुस्तकांत ग्रथित केली आहे.
 शिकागो, ऑरेगान व वाशिंग्टन ह्या विश्वविद्यालयांत त्यांनीं चार वर्षेपर्यंत अर्थशास्त्र व राजकारण ह्या विषयांचा अभ्यास केला व नंतर पायानींच अमेरिकेंत बराच प्रवास केला. अमेरिकेंत अशा प्रकारें सुमारें ५॥ वर्ष घालविल्यावर स्वामी सत्यदेव स्वदेशीं परत आले व लागलीच त्यांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा आपल्या देशबांधवांना देण्याच्या इराद्यानें आपल्या मातृभाषेत 'सत्यग्रंथ माला' सुरूं केली हें वर सांगितलेंच आहे. स्वामीजींची पुस्तकं बरीच लोकप्रिय झालीं असून कांहीं कांहीं पुस्तकांच्या ६|६ देखील आवृत्त्या निघाल्या आहेत.
 स्वामी सत्यदेवांचा अशा प्रकारें अल्पपरिचय करून दिल्यावर आभार प्रदर्शनाचे तेवढें गोड काम राहिलें आहे. अभिनव ग्रंथमाला सुरूं करण्यास आपली अनुज्ञा देऊन व आपले कांहीं फोटो पाठवून स्वामी सत्यदेवांनीं आम्हांस कायमचेच ऋणी करून ठेविलें आहे,अर्थातच स्वामीजींचा कृतज्ञतापूर्वक प्रथमच उल्लेख करणें अवश्य आहे. टिळकमहाविद्यालयांत घडून आलेल्या अल्प