पान:अभिव्यक्ती.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ / अभिव्यक्ती " मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे | अलौकिक नोहावे । लोकांप्रति । ।” आपण कुणीतरी अलौकिक आहोत असे न मानता - 65 शहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टीमध्ये भगवत् भजन वाढवावे ।। ” ज्ञानदेव-नामदेवादी संतांनी हेच कृतीत आणले, त्यांनी शूद्रातिशूद्रांनाही 'स्व'त्वाची जाणीव करून दिली; त्यांनाही स्वतःच्या उद्धाराची तळमळ लावली, त्यांना सुखाचा, आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा करून दिला. गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, चोखामेळा, सावता माळी, कान्होपात्रा, जनाबाई या सर्व जमातींतील आणि विविध व्यवसायांतील प्रतिमांच्या साहाय्याने त्यांनी परमेश्वराला आळविले. एक समृद्ध, संपन्न, निर्मळ व्यक्तित्वाचा कलात्मक आविष्कार असलेले काव्य त्यांतून जन्मले. लागते. " आम्ही वारिक वारिक । करू हजामत वारिक बारिक । 'कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी | 'देवा, तुझा मी सोनार । तुझे नावाचा व्यवहार । 'बरा कुणबी केलो । नाही तरी दंभे असतो मेलो । ' महाराष्ट्रात सुरू झालेली दलित साहित्याची ही पहिली चळवळ म्हणावी संत परिसापेक्षाही श्रेष्ठ खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीय संत हे त्या काळचे समाजसुधारक आहेत. या सर्वच सुधारकांचे आचरण अत्यंत शुद्ध होते. शुद्ध आचरण व समाज सुसंस्कृत करण्याची तीव्र आकांक्षा यांमुळे जनमानसावर त्यांचा प्रभाव पडला. ते लोकमान्य झाले. सत्य, भक्ती, सहिष्णुता, सौजन्य, निःस्पृहता, उदारता आदी गुण त्यांनी समाजाला शिकविले. लोक- मनावर उदात्त संस्कार घडवून त्या आधारे समाजातील 'स्वत्व' टिकवून धरावे यासाठी संतांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी वैराग्याची शिकवण दिली. त्या मागेही हेतू उदात्तच होता.. ज्ञानाला स्थैर्य लाभावे, बुद्धीला नवे तेज चढावे म्हणून निवृत्तीची शिकवण देणे त्यांना आवश्यक वाटले. मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीला ज्ञानातील डोळसपणा, ध्यानातील एकाग्रता, कार्यातील शुचिता आणि भक्तीतील समर्पणशीलता या चारही गोष्टींची आवश्यकता आहे हे संतांचे मत होते. तात्पर्य, सर्व प्रवृत्ती समन्वयाने महाराष्ट्रातील संतांनी अध्यात्मनिष्ठ मानवतावादी एक उदार व प्रगतीशील विचारसरणी अस्तित्वात आणली. संतांचे मोठेपण वर्णन करीत असताना ज्ञानदेवांनी म्हटले आहे की, त्यांची तुलना सूर्य, चंद्र, मेघ यांपैकी कुणाशीही करता येत नाही, कारण प्रत्येकांत उणीव आहे. तेजे सूर्य तैसे उजळ । परि तो अस्तवे हे किडाळ । चंद्र संपूर्ण एकाधी वेळ । ते सदा पुरते ॥