पान:अभिव्यक्ती.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी संत : सामाजिक आणि वाङमयीन कार्य / ९५ मेघु उदारु परि ओसरे । म्हणौनी उपमेसि नुपकरे । ते नि:शंकपणें सपाखरे | पंचानन || सकाळ झाल्याशिवाय ते जगाला प्रकाश देतात आणि अमृताशिवायच ते लोकांना जगवितात. " 'पहाटेवीण पाहाटवित । अमृतेंवीण जिववित । योगेंविण दावित । कैवल्य डोळां " 11 असे हे संत परिसापेक्षा श्रेष्ठ ठरतात. कारण, परीस हा लोहावर घासला व त्याचा स्पर्श लोहाला केला तर त्याचे सोने होते; परंतु संतांच्या सहवासात जे येतात, संतांचा सहवासरूपी स्पर्श ज्यांना होतो त्यांनाही ते संतच करतात. संत हे इतरांना संत बनवितात. ह्यातच संतांचे मोठेपण आहे. ' परीस' हा लोहाचे सोने करतो, पण लोहाचा तो परीस करीत नाही. आजच्या बदलत्या परिस्थितीचा, काळाचा जरी विचार केला तरी आजही संतांच्या विचारसरणीचाच अवलंब केला पाहिजे. निष्काम, निःस्वार्थी निःस्पृह व निरपेक्ष वृत्तीने कार्यरत राहिल्याने व्यक्तीचा विकास व व्यक्तीचे कल्याण साधू शकेल. संतसाहित्य ही सुप्तावस्थेतील कलावंताची निर्मिती हे सारे महाराष्ट्रीय संत आत्मविस्मृत कलावंत होते, unconscious artists होते. आपण श्रेष्ठ कलात्मक साहित्य निर्माण करतो याची त्यांना अजिबात जाणीव नव्हती. त्यांची भूमिका अगदी साधी होती. 'वेडावाकुडा गाईन । परि तुझाच म्हणवीन ।' कसेही असले तरी परमेश्वराने ते गोड करून घ्यावे. परमेश्वर भजन-चिंतन भक्ती हाच त्यांच्या वाङ्मयनिर्मिती मागील प्रमुख हेतू होता. भक्ती हाच संतसाहित्याचा स्थायीभाव आहे. नेणिवेतून निर्माण झालेले हे साहित्य 'साहित्य' या दृष्टीने तपासले तर श्रेष्ठ प्रतीचे ठरते. त्याला कलात्मक पातळी लाभलेली आहे असे निश्चितपणे म्हणता येते. कलावंताचे अंतर्मन खऱ्या अर्थाने कलाकृती घडवीत असते. ह्याचा प्रत्यय संत- साहित्याच्या परिशीलनाने सहज येऊ शकतो. मनाच्या भावभावनांनाच त्यांनी शब्दबद्ध केले आहे. त्यांत नम्रता हा सरळपणा, निर्मळ अंतःकरणच जाणवते. कुठेही दंभ, गर्व अथवा अहंभाव डोकावत नाही. झुळझुळ वाहाणाऱ्या जिवंत झऱ्यासारखे संतसाहित्याचे स्वरूपही निर्मळ आहे. साहित्यातून व्यक्त होणारी संतांची मने निरागस, निष्पाप असून भक्तिभावाने तुडुंब भरलेली असल्याचे जाणवते. म्हणूनच पाषाणालादेखील पाझर फोडण्याचे सामर्थ्य संतसाहित्यात अवतरले आहे.