पान:अभिव्यक्ती.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी संत : सामाजिक आणि वाङमयीन कार्य / ९३ 'आनंदाचे आवारू ' निर्माण करण्याची एवढ्यासाठी या संतांनी प्रथम प्रतिज्ञा केली. 'सकळाशी येथ आहे अधिकार ' वरिष्ठ, उच्चजातीतील संतांनी प्रामुख्याने स्त्रीशूद्रादिकांचा व बहुजन दलित समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाच्या खालच्या वर्गातील संतांनी स्वतःच्या आत्मोद्धाराचीच काळजी वाहिली. अध्यात्मिक पातळीवर सर्वांना समान अधिकार आहेत. आत्मोन्नतीनंतर तेही समाजोन्नतीकडे वळले. — तोचि देवभक्त भेदाभेद नाही ज्यात ।। ' हेच त्यांनी अमलात आणून दाखविले. अध्यात्मिक लोकशाही, समता, बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार करणारी भक्तिमार्गी, - आस्तिक संस्था त्यांना प्रस्थापित करावयाची होती. या अध्यात्मिक पातळीवर ते कसल्याही प्रकारचे भेदभाव मानीत नव्हते. अध्यात्मिक लोकशाहीचा पुरस्कार महाराष्ट्रीय संतांची भक्ती डोळस होती. अंधश्रद्धा कवटाळून ते बसले नाहीत. समाजातील विषमता, दोष, उणिवा, व्यभिचार, दुष्कृत्ये यांचा ज्या वेळी उल्लेख येतो त्यात्या वेळी संतांची वाणी रोकडी आणि परखड बनते. तिला विलक्षण धार प्राप्त होते. या संदर्भात संत तुकारामांच्या अभंगांचा उल्लेख करता येतो. समाज वैगुण्यावर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. केवळ तात्त्विक विवेचन न करता प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर संतांनी भर दिला असल्यामुळे त्यांच्या अभंगांत व साहित्यांत कठोर वास्तवाची बूज राखली गेली. प्रत्यक्षावर आधारित तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले. विचारभावना आणि कृती यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला. या संतांनी नुसता मानवतेचा प्रचार केला नाही. तर त्यांनी मानवतेच्या समतेचा प्रचार केलेला आहे. त्यांनी सर्वांना समदृष्टीने पाहिले. त्यांनी " बहुजन समाजाच्या धर्म जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान मिळवून दिले, शूद्रादी रुढीग्रस्तांना अंतर्मुख बनविले, त्यांच्यात आत्मोन्नतीची प्रेरणा निर्माण केली. 'स्वान्त सुखाय बहुजनहिताय । , " या संदर्भात ज्ञानदेवाच्या कार्याचा विचार केला असता संतांच्या उपकाराची कल्पना येते. जगाचे कल्याण चितण्यातच या संतांनी आपल्या आयुष्याचे सार्थक मानले, एवढेच नव्हे तर आपला जन्मच तेवढ्यासाठी झालेला आहे, असे त्यांनी मानले. ज्ञानदेवांच्या कार्याचे मोठेपण त्यानंतर उदयाला आलेल्या संतमंडळींनीच सिद्ध केले. ज्ञानेश्वरांच्या कार्याचा पगडाच एवढा मोठा होता की महाराष्ट्र समाजाच्या सर्व थरांतील स्त्रीपुरुषांना त्यांनी बोलके केले. समाजाच्या विविध थरांतून संत उदयाला आले. या सर्व संतांची वृत्ती स्वतःचा उद्धार करून घेण्याची होतीच. परंतु त्याबरोबरच बहुजन समाजाचे हित साधण्यावरही ती केंद्रित झाली होती.