पान:अभिव्यक्ती.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ / अभिव्यक्ती एकाच वेळी ' मऊ मेणाहूनि ' असून ' कठिण वज्रासहि भेटू ' अशी त्यांची तयारी होती. सज्जनाचा पुरस्कार आणि दुर्जनाचा धिक्कार हेच त्यांचे ब्रीद होते. ' भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथा देऊ काठी । , हाच अस्सल मराठी बाणा संतांनी अंगिकारला होता. खरोखर संतांच्या कार्याचे मोठेपण ह्याच प्रवृत्तीत समावलेले होते असे म्हणता येईल. 'बुडती हे जन न देखवे डोळां ' तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात संतांनी केलेल्या कार्याची दखल घेतल्यास त्याचे मोल अधिकाधिक जाणवू लागते. बदलत्या परिस्थितीत, प्राप्त कालमाना- नुसार त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाला आणि विचारांनादेखील कालोचित आकार दिलेला दृष्टोत्पत्तीस येतो. वस्तुतः या संतांना क्रांतिकारकांची भूमिका घेता आली असती, नाही असे नाही. परंतु त्यावेळी ते अनुचित ठरले असते. ज्या पंथांनी अगर संप्रदायांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला, पण लोक गंगेच्या प्रवाहाची, ओघाची घ्यावी तशी दखल घेतली नाही हे सारे अप्रिय ठरले. (मग त्यांचे तत्त्वज्ञान कदाचित अधिक पुरोगामीही असू शकेल. ) तत्कालीन समाजव्यवस्था एका विशिष्ट साच्यात बंदिस्त होती. त्यामागील कारणमीमांसा कदाचित वेगवेगळी असू शकेल, पण यामुळे क्रांती होऊ शकली नाही. जुन्याला प्रमाण मानून त्यात राहूनच त्याला सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न संतांनी केला. महाराष्ट्रीय संतांनी या नव्या-जुन्या प्रवृत्तींचा उत्कृष्ट समन्वय साधलेला आहे. ज्ञानदेव-नामदेवाच्या वेळची परिस्थिती जर लक्षात घेतली तर महाराष्ट्रात स्वराज्य नांदत असले तरी आपसातील फुटीर वृत्तीमुळे - दुहीमुळे - राज्यात सौख्य नव्हते. धर्माच्या नावाखाली अनाचार, व्यभिचार चाले, खरा धर्म लोप पावून नुसत्या व्रतवैकल्यालाच प्राधान्य मिळाले होते. विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड नव्हती. नामदेवाने एका अभंगात ह्या वेळच्या परिस्थितीचे मोठे मार्मिक चित्र रेखाटले आहे. 4 तत्त्व पुसावया गेलो वेदज्ञाशी । तंव भरले त्यांपाशी विधिनिषेध || तयां समाधान नुमजे कोणे काळीं । अहंकार बळी झाला तेथे ॥ 4 एक एकाच्या न मिळती मताशीं । भ्रांत गर्वराशी भुलले सदा ॥ जीवनाची सर्वच अंगे धर्माने व्यापली होती. धर्माखेरीज अन्य कोणत्याच गोष्टीला थारा दिला जात नव्हता. अशा वेळी काळाची पाऊले ओळखून संतांनी कार्यक्रम आखले. 'बुडती हे जन न देखवे डोळां 1