पान:अभिव्यक्ती.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ / अभिव्यक्ती " 'हरवलेले विरलेले ' या साभिप्राय शीर्षकाच्या कथेत एक लेखक आणि गृहस्थ एका विशिष्टक्षणी समान पातळीवर येतात. आपल्या जीवनातील एका भयंकर, विदारक गोष्टीचा त्याला अचानक उलगडा होतो. आपली अपत्यही जगत नाहीत आणि आपले लेखनही परिपूर्ण स्वरूपात प्रकाशात येत नाही हे आपले नशीब. अपत्य आणि वाङमयीन अपत्यही जगणार वाढणार नाही हे खरं- आपली वांझ कुस, जनन अक्षम वीर्य.' कपाटात रचून ठेवलेल्या कथा म्हणजे कोल्डरूममध्ये ठेवलेली मृत अर्भकेच !' असा हा थरारक साक्षात्कार चित्रित करण्याची धडपड आहे. तर ' आजीच्या गोष्टीतील ' आजी अत्यंत पुरोगामी आहे. परक्या पुरुषासमोर विधवेला येऊ न देणारे न्हाव्यापुढे बसवितात म्हणून केशवपनानंतर पुन्हा केस वाढ- विणारी अजब आजी आहे. याच आजीचा जावई गेल्यावर विपरीत घडल्याचे सारे दु:ख गिळून पोरीला ती अभिमानाने स्वावलंबी व्हायला सांगते 'अग, दारिद्र्य सोसावं पण ओशाळं होऊ नये, समजलीस - ! शाळेत जायला लाग. , 'या वयात शाळेत जायच म्हणजे लोक हसतील' या मुलीच्या उद्गारावर आजी म्हणते, ' कोणी हसत नाही आणि हसले तर दात पाहावेत आणि पाडावेतही. ' मुलांनी हाकून दिली तर दारटोळ्या करीत हिंडायला नको' ही तिची स्वाधीन वृत्ती. आपण मेल्यानंतर धार्मिक क्रियाकर्म न करता एखाद्या गरिबाला मदत करावी, असे तिने सांगितले होते. या कथेच्या शेवटी म्हणूनच लवकर कावळा पिंडाला शिवत नाही. पण जेव्हा ही आजी स्मरते तेव्हा 'मग त्यांची शाळाच भरली होती' असे चपखल कथन करून गोष्ट संपविली आहे. 4 'दंश' या कथेमध्ये संशयकल्लोळातील रेवतीच्या कोटीतील एका कला- वंतीणीशी एका नाटककाराचा नाटकातील पदांना चाली देण्याच्या निमित्ताने संबंध जुळलेला दाखविला आहे. एकदा त्याच्या पायावरचा बदबदलेला इसब तिच्या रोमारोमात भिनतो आणि मग ती दंश करणारे उद्गार काढते - - ' हे नुसते नावाला नवमतवादी ! अंगाजवळ येऊ लागलं की दूर सरणाऱ्या भ्याडांच्या पिढीतील आहेत. ' खोट्या प्रतिष्ठेपायी तो खऱ्या अर्थाने तिच्यापासून दूरच असतो. केवळ इथे स्वार्थच शिल्लक राहातो हे तिच्या लक्षात येते आणि मग त्याच्या पायाचा इसब त्याला दंश करतो आणि तिथेच त्याचा मानसिक मृत्यू घडतो. पांढरपेशा माणूस म्हणजे नदीकाठची 'पांढरी माती ' उन्हात रखरख तापणारी- गारठ्यात कोळपणारी - फुफाटा - भुसकटच. भानगावच्या श्रमसंस्कार शिबिरात पदयात्रेत एका हरिजनवस्तीत आलेला कटू पण मोठा धारदार अनुभव 'पांढरी माती' या कथेत चित्रित करण्याचा हेतू आहे, पण त्यातील स्पंदन हरपते. 1 प्रा. वर्तकांनी विशिष्ट अनुभवांची दिलेली कारणमीमांसा आणि मधूनमधून केलेली घटना-प्रसंगांची पेरणी त्यांच्या कथेच्या व्यापक संदर्भात समजावून घेतली