पान:अभिव्यक्ती.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनमोर : एक आस्वाद / ८७ टिपले आहेत. या कथेचा शेवटही मोठा मार्मिक केला आहे. दिनूचा बाप दिनूला पाहून विचारतो. 'पळून तर नाही ना आलास ? ' इथे दिनूचे खरे वय कळते. तुरुंगातून सुटून आलेला मुलगा वापाला पळून आल्यागत वाटतो. " 'आवर्त ' या कथेचे निवेदन पुरेशा मोकळ्या मनाने झाले आहे म्हणूनच ही कथा आकाराने मोठी आशयानुरूप झाली आहे. या कथेतील एक प्रसंग या संदर्भात लक्षात घेण्याजोगा आहे. एकदा तुरुंगातील दिवे गेलेले असताना दिनूशी शंकर कदम चावटपणा करतो. शंकर कदम काय करतो याची फारशी जाणीवही या दिनूला नाही. पण दिनूच्या वयाला साजेल अशी प्रतिक्रिया देऊन हा प्रसंग लेखकाने मोठ्या संयमाने व सूचकतेने चित्रित केला आहे. 'दिनू, त्या दिवशी चुकलो, पुन्हा चुकणार नाही' अशी माफी शंकर कदम मागून हे प्रकरण एवढ्यावरच मिटते. 'अंधार लाटा' मध्ये प्रा. साने थर्मामीटरमधला पारा घुटमळावा तसा जीव घुटमळणारे एकाएकी झाले. कारण 'डिटॅचमेंट ऑफ रेटिना.' तीन आठवडे, स्टीच केलेली रेटिना डिस्पोज होऊ नये म्हणून त्यांना झोपलेल्या पोझिशनमध्ये डोके न हलविता डोळ्यांना बँडेज ठेवून तीन आठवडे राहावे लागले. वस्तुतः बुद्धिजीवी माणसाचे डोळे हेच सर्वस्व, नाहीतर करिअरच ऑफ. या तीन आठवड्यांतच ह्या प्राध्यापकांनी जे अनुभवले, त्यांच्या जीवाची घालमेल होऊन त्यांना जे ब्रह्मांड आठवले ते मोठ्या सहृदयतेने लेखकाने रेखाटण्याचा प्रयत्न केला. आरंभी या कथेचे रूप पसरट वाटले आणि खरोखरीच एवढा विस्तार आवश्यक होता काय ? काही ' मजकूर' तर लेखक यात अंतर्भूत करीत नाही ना ? असे प्रश्न मनात निर्माण झाले पण लगेच भासणाऱ्या या विस्ताराची अपरिहार्यता लेखकाने निवडलेल्या डोळस ( आणि डोळस नसलेल्या ) विश्वातील प्रसंगांवरून डॉक्टर, पटली. भेटायला येणाऱ्या व प्रा. साने यांच्या सभोवतालच्या व्यक्ती प्रा. साने यांची पत्नी सुलभा, प्रा. डॉ. कोटस्थाने, प्रा. काळे, मित्र घाटे - दिनशा, प्रा. साने यांनी ' याची देही याचि डोळा' पाहिलेला काल्पनिक आत्महत्येचा प्रसंग आणि कॉलेजमधील श्रद्धांजली सोहळा - हे सारे विश्व ओळखीचे आणि हृदयस्पर्शी वाटू लागते. प्राध्यापक कथाकार स्वतः आहे हे जाणवते. 1 'यात्रा' या कथेत ठार वेड्या झालेल्या एका 'माधवा' चे वेडेपण अंत:- करणाचा ठाव घेणारे झाले आहे. अगदी आरंभापासून ही कथा हा प्रत्यय देते. त्याचे वडील अप्पासाहेब यांना माधवाची मेंटल हॉस्पिटलमध्ये होत असलेली ही रवानगी म्हणजे ' वाटून गेलं की, त्याला टॅक्सीतून नेले म्हणजे त्याची अंत्ययात्राच होती. '