पान:अभिव्यक्ती.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनमोर : एक आस्वाद / ८९ तरच ती अर्थपूर्ण ठरते. 'मनमोर ' मधील फेरा, आवर्त, अंधारलाटा, हरवलेले विरलेले, पांढरी माती, एका आजीची गोष्ट, यात्रा या कथा विलक्षण अनुभूतीने भरलेल्या आहेत. मानवी स्वभाव आणि जीवन यांत रस असलेली ही कथा म्हणूनच परिणामकारक होऊ पाहाते. सकृतदर्शनी प्रा. वर्तकांची कथा वरवरचे नित्याचे परिचयाचेच जीवनदर्शन घडविणारी - प्रगट चिंतन करायला लावणारी वाटते पण कथा वाचता वाचता अनुभवाचे ढोबळ रूप सूक्ष्म होऊ लागते. कथानुभव बाह्य थरातून झिरपत झिरपत आत खोलवर मानवी भावनांच्या तळाशी आपले नाते प्रस्थापित करू लागताना येथवर आपण येऊन पोहोचलो याचे भानही मग वाचकाला राहात नाही. अंधारलाटा, यात्रा, हरवलेले विरलेले, एका आजीची गोष्ट या त्यांच्या कथा हृदयस्पर्शी म्हणता येतील. कारुण्याची पुटं-आवरणं स्पष्टपणे लक्षात न येताही या कथांना लाभलेली आहेत असे म्हणावेसे वाटते. अनुभवाचे व्यामिश्र ( complex ), गुंतागुंतीचे आस्वाद अक्षम स्वरूप त्यांच्या या कथांमध्ये फारसे आढळत नाही. उलट अर्थानुभव कमालीच्या मोकळे - पणाने - स्पष्टपणाने, भाषा प्रलोभनाच्या आहारी न जाता स्वतःच्या खास ढंगात रममाण झालेला दिसतो. क्वचित 'पराणी', 'गंथी ', ' सर्वपल्ली ' व ' पारिभाषिक इंग्रजी' अशा अपरिचित शब्दांचा वापर ओघात त्यांच्या कथेत आला आहे. कोणत्याही 'आवर्तात' अथवा ' फे-यात ' त्यांची भाषा सापडलेली नाही हे विशेषत्वाने जाणवते. अकारण अलंकरणाच्या वा प्रतिमांच्या योजनेच्या भरीस ही भाषा पडत नाही. त्याचप्रमाणे वाचकांचा अनुनय करणेही तिला पसंत नाही. मात्र क्वचित बहिर्मुख बनते. काउंटर क्लार्क ' उद्या कंटाळून चष्म्याची काच खाऊन जीव दिलास तर ?' ( आवर्त ) इन्स्पेक्टर : 'ह्याला आत घे रे. कबूल करत नाही काय मादरचोद. बोच्याला चिमटा लावा म्हणजे बोलेल सरळ. ' ( आवर्त ) ' लेण्यातील शिल्पे जशी गडद अंधारात बडून जातात तशी कथा मनातून ( हरवलेले विरलेले ) निसटून जाते ! ' आपण मात्र पाऱ्याचा स्टाटिंग पॉईंटच राहातो. ' ( नाथा ) 1 'शून्य मनाच्या घुमटात अंधाराच्या लाटा उंचावल्या भिंत खचली. आत्मा कलथून गेला. ' ( अंधारलाटा ) — अंगावरून वळ्यावळ्याचे सुरवंट फिरून गेले. ' ( दंश ) उंचावल्या, देहाची या उधृतांवरून प्रा. वर्तकांची भाषा सरळ धोपट वाटली तरी ती 'अनुभवानुनय करू पाहाणारी आहे हे लक्षात येते. 'यात्रा'मधील वेड्या माधवाचे असंबद्ध बोलणे लक्षणीय आहे. सहस्र नेत्र इंद्र, भीष्माचे इच्छामरण, घटोत्कच इत्यादी