पान:अभिव्यक्ती.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ / अभिव्यक्ती लेखकाला विशेषत्वाने जाणवले आणि पाहाता पाहाता ते पोलीस जिवंत असूनही अगदी प्रेतवत बनले. या अनुभूतीला आणखी एक गहिरी छटा प्राप्त झाली ती त्या कॉन्स्टेबलच्या या ड्यूटीवर निघतानाच्या मनःस्थितीच्या चित्रणामुळे ! यावेळी त्यांच्या पत्नीला प्रसूतिवेदना सुरू झालेल्या असतात. जन्म-मरणाच्या एकाच वेळी अवस्थांच्या चित्रणाने एक भीषण व बोलका संदर्भ या कथेला प्राप्त होतो. "हिंदूंच्या स्मशानात एका खुर्चीवर बसलेला कॉन्स्टेबल, पत्नीच्या प्रसूतीच्या ‘वेणा' सुरू झाल्यावरही ड्यूटीवर निघून यावे लागल्यामुळे संतापलेला मनातल्या काहूराने अक्षरश: चक्रावतो. माणसातील सारे धर्म चिकटलेला, माणसांचा त्या राखेला असलेला वास - आणि बायकोच्या बाळंतपणाचा ताण एकाच वेळी त्याच्या डोक्यात भिनतो. संज्ञाप्रवाहांचे एक मनोज्ञ दर्शन येथे घडते. एवढ्या थरारक अनुभवाचे चित्रण करून अखेरीस त्याच्या अंतर्यामी झांजा वाजत होत्या . 33 'असा फेन्यांतच या कथेचा मार्मिक शेवट केला आहे. सूक्ष्म मनोविश्लेषण आणि एका आगळ्या दृष्टीने केलेले निरीक्षण साकारणारी ही कथा आपोआप फुलून आली आहे. वाचकांचे जाणीवपूर्वक भान ठेवून लिहिलेली ही कथा आहे असे म्हणता येत नाही. त्यामुळेच कृत्रिमतेला संपूर्ण फाटा मिळालेला आहे. ‘आवर्त' ह्या प्रदीर्घ कथेमध्ये ' दिनू' हा अवघा १६-१७ वर्षे वयाचा मुलगा. ज्या मनःस्थितीमध्ये तुरुंगात जातो त्यापेक्षा एक वेगळी मनोवस्था धारण करून हा बाहेर पडताना दिसतो. येथे कथाकार आवर्तात सापडला. 1 ' दिनूचा भाऊ ' बना' याचेही चित्र या कथेत ठळकपणे आले आहे. बना व्याव- हारिक तडजोड करून सत्याग्रहापासून दूर राहातो पण तो दिनूला पत्राने कळवितो, मागे फिरलास तर आत्महत्या हा एकच मार्ग तुला आहे. असा हा ' बना ' आणि त्याचे वडील यांच्यात जमीनअस्मानाचे अंतर ! ते म्हणतात, 'सत्याग्रहापायी शिक्षण थांबले तर स्वतःसाठी खड्डा खणला म्हणून समज. ' म्हणूनच आरंभी ते भीती दाखवितात ' दिनू – सत्याग्रहात जातोस तर जा पण सुटल्यावर पुन्हा घरी येऊ नकोस.' तुरुंगातले ते भयंकर एकाकीपण 'भरल्या जगाच्या पुष्कळच जवळ होतो आम्ही' असे समाधान मानीत दिनू स्वीकारतो. त्याच्या चेहऱ्यावरची सुखासीनतेची आणि निष्पापपणाची या संपूर्ण कथेत मोडू दिली नाही. 'जेलमध्येसुद्धा आपण आपल्या घरीच झोपलेलो असतो' अशी दररोज सकाळी जाणीव होणारा हा मुलगा असतो. पण एका प्रतिष्ठित पर्वातून वनपर्वात हा त्याने केलेला प्रवेश म्हणजे ध्येयवादाबरोबरच भावनावश होऊन सरकारविरुद्धच्या त्या सत्याग्रहात त्याचे सहभागी होणे. शेवटी 'आवर्त उठलं होतं आणि शांत झालं होतं. ' बना तुरुंगात आला आणि पोरसवदा दिनू नेमका त्याच- वेळी सुटला हा विलक्षण योग इथे घडतो. तरीही ' दिनू या सुटकेतून आनंदलाच ' असे सूक्ष्म भाव लेखकाने हळुवार मनाने या किशोराच्या मनाचे चित्र रेखाटताना