पान:अभिव्यक्ती.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" कथाकार दिवाकर : निवडक विचार / ८३ संध्याकाळी भाई जेवायला आले म्हणजे सांग बरं त्यांना ! फडफड असा आवाज झाला. पितळेच्या पिंजऱ्यातल्या पोपटाने पंख झाडले. ' भाई भेटत नाही म्हणून पोपटच्या मनाची घालमेल सूचित केली आहे. पाचव्या दिवशी घरातल्या पिंजऱ्याचा दरवाजा नोकरांनी निष्काळजीपणाने उघडा टाकला. त्यातला पोपट जो एकदा उडाला तो पुन्हा सापडला नाही. जवळजवळ त्यावेळी पोपट आपल्या कुडीचा पिंजरा सोडून उडून गेला. पुन्हा तो परत आला नाही. — पल्लीपतीला नीलमचा मोह अनावर होतो तेवढ्यात देवव्रताचा बाण त्याच्या पाठीत घुसतो!' इथे प्रसंग चित्रातील संयमजाणवतो. देवव्रत विचाराच्या काहूरात बुडून जातो तेव्हा प्रश्नांकित परिच्छेद आपोआप तयार होतो. 'नीलेचे काय करावे ? ऋतेचे काय करावे ? का स्वतःचे काहीतरी बरेवाईट करावे ? मग ऋतेचे काय होईल ? नीलम काय करील ? स्वसेशी विवाह करावा की अनार्या पाणिग्रहण करावे ? का स्त्रीहत्या, आत्महत्या आणि वंशक्षयाला कारण "व्हावे ? काय करावे ? काय करावे ? ' “ भरलेल्या अंतःकरणाला जरा धक्का लागला, तर त्यावर तरंग उठल्या- शिवाय आणि त्यातले पाणी डोळ्यांवाटे सांडल्याशिवाय कसे राहील ? " मोठ- मोठ्या खोडांना कशाची विशेष पर्वा नसते. पण लहान लहान हिरव्या वेलींची गोष्ट तशी नाही. अशोकासारखा आनंदी आणि भारीच प्रेमळ अशा मुलासाठी एखाद्या अशाच मृणालिनीने छंद घेतला तर त्यात काय बरे झाले ! ' (मृणालिनीचे लावण्य ) या भाषेत अपवादात्मक विनोदी वृत्ती आढळेल. 'बी. ए. - पदर', आम्हाला परीक्षेला टेनिसनचे 'क्रॉसिंग द बार' होते. आम्हाला परीक्षेचा 'बार' काही ओलांडता आला नाही एवढेच ! अंगणातला पोपट ' या कथेत तर प्रतीकयोजनेचा अट्टाहासच जाणवतो. गिरगावच्या, बंगल्यातील त्रिकोणी बंदिस्त अंगण म्हणजे एक पिंजराच, ज्यात सहा वर्षांचा पोपट ' अंगणातला पोपट' ठरला. त्याला पुन्हा पोपटाची आवड, पितळी पिंजऱ्यातला पोपट, पुन्हा लाकडी हिरवा पोपट, मावशीने काढलेला कशिद्याचा पोपट, असे पोपटमय हे विश्व ! लेखकाचा वाचकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न येथे कथारूपाला बाधकच ठरला आहे. कथेच्या शिरोभागी असलेली बोधवाक्ये इंग्रजी- संस्कृत 'Time has no pity. . .for human heart — He Laughs at its sad struggle to remember. ' (रवींद्रनाथ ) किंवा ' अयि विद्युत् प्रमदानां त्वमपिच दुःखं न जानासि !' त्याचप्रमाणे त्यांनी वाचकांशी संवादही साधलेला आहे. ' शांताबाई - संबंधी स्तुतीशिवाय एक शब्दही माझ्या लेखणीतून उतरणार नाही.' (संकष्ट चतुर्थी) किंवा ' मला हे सर्व लिहिणे बरे वाटते का ? नाही. माझ्या अंतःकरणातल्या अगदी